रंकाळा स्टैंड कोल्हापूर येथील केदार डायबेटीस अॅन्ड ओबेसिटी सेंटरचे मधुमेह तज्ज्ञ डॉ. महेंद्र देशमाने यांना नुकतीच हैदराबाद येथे डायबेटीसमधील उल्लेखनीय अशी डायबेटीस इंडिया ची फेलोशिप दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदान करणेत आली. यावेळी इंटरनॅशनल डायबेटीस फेडरेशनच्या २०२७ च्या प्रेसिडेंट डॉ. निती पॉल, डॉ. जोनाथन शॉ, डायबेटीस इंडियाचे प्रेसिडेंट डॉ. एस.आर. अरविंद, डॉ. बन्सी साबू तसेच पद्मश्री डॉ. शशांक जोशी यांचे उपस्थितीमध्ये प्रदान करणेत आली. डायबेटीस इंडियाच्या या कॉन्व्होकेशन मिटींगवेळी भारत तसेच इतर देशांमधील अनेक डॉक्टर्स उपस्थित होते.
डायबेटीस मधील अद्यावत ज्ञानाचा उपयोग आपल्या भागातील डायबेटीस रूग्णांना वाजवी दरामध्ये व्हावा अशी यावेळी भावना व्यक्त करण्यात आली.



