संचालक वाढीचा निर्णय गोकुळच्या भविष्यकालीन फायद्यासाठीच
‘गोकुळ’ कार्यकारी संचालक गोडबोलेंची माहिती
कोल्हापूर : जाजम व घड्याळ कोटेशनशिवाय खरेदीच्या आरोपात वस्तुस्थिती नाही. भोकरपाडा येथील जमीन व्यवहारात कोणतीही थेट खरेदी नाही, तसेच ऑक्सिजन प्रकल्प कालानुरूप वापरात बदल केल्याची माहिती जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
याचबरोबर संचालक वाढीचा निर्णय संस्थेच्या भविष्यासाठी आवश्यक पाऊल असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आज ‘गोकुळ’ मध्ये कोटेशनशिवाय खरेदीसह अन्य आरोप केले आहेत. तसेच ‘कारभार चांगला तर टोकन कशासाठी’, असा सवाल उपस्थित केला. याबाबत मंत्री हसन मुश्रीफ उद्या कोल्हापुरात आल्यानंतर सविस्तर माहिती देणार आहेत.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, संचालकांची बैठक १९ मार्च २०२५ नुसार संघाच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त संघास दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांना जाजम व घड्याळ भेट देण्याचा निर्णय झाला आहे. या खरेदीकरिता संचालक मंडळाच्या मंजुरीने पुरवठादारांकडून
कोटेशन मागवून दराबाबत चर्चा करून कमीतकमी दर देणाऱ्या व्यक्तीला खरेदी आदेश काढण्यात आले असून त्याचे बिल संघाच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे टप्प्याटप्प्याने अदा केले आहे.
तसेच भोकरपाडा येथील जमीन खरेदीसाठी संघ प्रशासन आग्रही होते. भोकरपाडा एमआयडीसीची जमीन खरेदी केल्याने संघाला होणारा फायदा याचा अभ्यासही केला होता; पण तांत्रिक अडचणी आल्याने भोकरपाडा येथील जमिनीचा व्यवहार होऊ शकला नाही आणि व्यवहार न झाल्याने संघाने एकही रुपया भोकरपाडा येथे खर्च केलेला नाही.
म्हणून संचालकांची संख्या वाढ
जिल्हा असून जिल्ह्यातील बारा संघाचे कार्यक्षेत्र संपूर्ण कोल्हापूर तालुक्यातील १२३६ गावांमध्ये विखुरलेले आहे. जिल्ह्यातील ६३१६ दूध संस्थांमार्फत दूध संकलनाचे कामकाज केले जाते. कार्यक्षेत्रात भौगोलिकदृष्ट्या समानता येण्यासाठी तालुकाप्रमाणे विभागणी केली आहे. निवडून द्यावयाच्या संचालकांची संख्या अपुरी असल्याने कार्यक्षेत्रातील सर्व सभासदांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळत नाही. त्यामुळे पोटनियमात सुधारणा करणे जरुरीचे आहे, असे पत्रकात म्हटले आहे.