डिझाईनसाठी सामाजिक जाण आवश्यक: जिल्हाधिकारी येडगे
घोडावत विद्यापीठाच्या ‘कलानुभव’ प्रदर्शनाचे उद्घाटन
कोल्हापूर: डिझाईन क्षेत्रात शिक्षण घेताना व करिअर करताना विद्यार्थ्यांना सामाजिक जाण असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल घाडगे यांनी केले. संजय घोडावत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ डिझाईन च्या वतीने आयोजित कलानुभव 2025 प्रदर्शनाचे उद्घाटन शाहू स्मारक, कोल्हापूर येथे २६ एप्रिल रोजी येडगे यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी म्हणाले, की विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात सादर केलेली कामे केवळ कलात्मक नाहीत तर सामाजिक जाण, नावीन्यपूर्ण विचार आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोगी केल्याचे दिसून येते. यासाठी विद्यार्थ्यांनी केलेले श्रम आणि सर्जनशीलता कौतुकास्पद आहे.
या प्रदर्शनात इंटेरियर डिझाईन, ग्राफिक डिझाईन, कम्युनिकेशन डिझाईन आणि फॅशन डिझाईन शाखेतील विद्यार्थ्यांनी केलेले प्रोजेक्ट प्रदर्शनात मांडण्यात आले.
घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. उद्धव भोसले यांनी कलानुभव प्रदर्शनासाठी कष्ट घेतलेल्या विद्यार्थ्यांचे आणि संचालक डॉ.विवेक कुलकर्णी, समन्वयक स्वप्नाली कुलकर्णी यांचे कौतुक केले. कलानुभव हे फक्त एक प्रदर्शन नसून विद्यार्थ्यांच्या कलात्मक प्रवासाचा, मेहनतीचा आणि विचारशक्तीचा सन्मान असल्याचा उल्लेख केला.
उद्घाटन प्रसंगी कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, मार्केटिंगचे अभिजीत लाटकर, डिझाईनचे सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. यासाठी चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी मार्गदर्शन केले.
26 व 27 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या याप्रदर्शनास विद्यार्थी, पालक, शिक्षक, डिझाईन क्षेत्रातील तज्ञ व कला क्षेत्रातील कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने भेट दिली.