डॉ. मंजिरी मोरे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलवर
विद्यापीठाच्या तीन संस्थावर सदस्यत्व घेत हॅट्रिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन व विद्या परिषदेच्या सदस्या प्रा. डॉ. मंजिरी देसाई-मोरे यांची बिनविरोध निवड झाली. एकाच वेळी सिनेट अकॅडमी कौन्सिल आणि मॅनेजमेंट कौन्सिलवर निवड होत त्यांनी हॅट्रिक साधली आहे.
मॅनेजमेंट कौन्सिल साठी अर्ज केलेल्या विद्या परिषदेच्या सदस्या व विद्यापीठातील जर्नालिझम विभागातील प्रा. डॉ. निशा मुडे यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतला. यामुळे मोरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
येत्या ११ एप्रिल रोजी अॅकेडमिक कौन्सिलची बैठक होत आहे. त्या बैठकीत मंजिरी मोरे यांच्या निवडीची अधिकृत घोषणा होईल.
या निवडीबाबत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जयकुमार देसाई, पॅटर्न कौन्सिल दौलत देसाई यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.