डॉ.सुनिल पाटील यांच्या ‘माणसं मनातली’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
कोल्हापूर
वडणगे गावचे सुपुत्र वैद्यराज सुनिल बी. पाटील लिखित ‘माणसं मनातली’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते वडणगे (ता. करवीर) येथे पार पडला.
यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले की, डॉ. सुनील पाटील यांच्याशी गेल्या 30 वर्षापासून जवळचा स्नेह आहे.त्यांनी ‘माणसं मनातली’ या पुस्तकात त्यांच्या जवळच्या 35 व्यक्तींबद्दल लिहिले आहे. या पुस्तकात माझ्याबद्दलही लिहून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. समाजकारण, राजकारण, साहित्य,पत्रकारिता,संगीत, आयुर्वेद अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉ .पाटील यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू असून माझ्याही मनात जी काही माणसं आहेत, त्यात डॉ.पाटील हे विशेष नाव असल्याचे नमूद केले.
या कार्यक्रमाचे स्वागत करताना डॉ.सुनील पाटील यांनी लिहिलेले हे पुस्तक ही आजपर्यत त्यांनी जपलेल्या माणसांच्या विशेष पैलूंचा एकत्रित दस्तावेज असल्याचे मी नमूद केले.
यावेळी प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक रमाकांत जाधव, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, बाळासाहेब पाटील दादा, सुजाता पाटील वहिनी, कॉम्रेड चंद्रकांत यादव, प्रा.पवन खेबुडकर, नामदेवराव कांबळे, तानाजीराव पाटील, अमर नाईक,प्राचार्य डॉ. विलास पवार, रवी पाटील, सचिन चौगले, प्रकाश पाटील, डॉ.ऋषिकेश जाधव, प्रा.नावले सर, शहाजी पाटील, सुरज पाटील, बी.आर पाटील, वाय. के. चौगले, आण्णासाहेब देवणे, सेवा सोसायटीचे चेअरमन उत्तम देवणे, प्राचार्य अजेय दळवी, बंडा पाटील, वसंत पाटील बापू, उत्तम पाटील दादा, शिवाजी पाटील, संजय पाटील,दीपक पाटील तसेच डॉ. प्रणव पाटील, डॉ शरयू पाटील ,अजित पाटील , बाळासाहेब ठमके, संभाजी गंडमाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.