लेखणीतून समाज बदलण्याचे प्रयत्न व्हावेत डॉ. व्ही. एन. शिंदे

Spread the news

 

­

 

लेखणीतून समाज बदलण्याचे प्रयत्न व्हावेत डॉ. व्ही. एन. शिंदे

  •  

कोल्हापूर दि. 15 साहित्य ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. सर्वांनी लिहिते व्हावे. पूर्वीच्या काळचे जगणे हे स्वतःसाठी होते आता ते दुस-याना दाखवण्यासाठी झाले आहे. समाज बदलण्यासाठी सातत्याने प्रयत्न असावेत आणि हे फक्त लेखणीतून साध्य होते म्हणून प्रत्येकाने लिहीत राहावे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिवन डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयात आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळयात ते बोतल होते.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर लिखित हिन्ही उपन्सास चेतना के नये आयाम व प्रा. एम. एम. कांबळे लिखित तुषार आनंदाचे विनो कथा संग्रह या दोन पुस्तकांचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, माजी हिंदी विभाग प्रमुख डॉ. पी. एस पाटील व प्रा. डॉ. मंजिरी मोरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

डॉ व्ही. एन. शिंदे यांनी बोलताना आपल्या जीवनातील अनुभव लिहीत असताना सातून खूप प्रगती होते. आल्यातील स्वार्थ आपले जगणे अवघड करतो यासाठी आपल्यात निस्वार्थ लेखन आणि दानत असावी लागते. प्रत्येक वीस वर्षांनी जुने शब्द बदलून नवीन शब्द येत असतात म्हणून वाचन व लेखन महत्वाचे आहे.

डॉ. पी. एस. पाटील यांनी बोलताना जीवनामध्ये विविध विषयावर जे विचार करतात ते प्रयत्नशील ठरतात. सर्वांगाने विचार केला तर ते अनुभव मिळतात ते समाजासाठी उच्च मनाचे असतात वाचन मानसाला विचार करायला लावते असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. मंजिरी मोरे यांनी सुरुवातीपासून संस्थेने केलेले कार्य आपल्या मनोगलामध्ये मांडले,

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. पी. बी. झावरे यांनी करुन दिला.

या कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई, चेअरमन प्रा. डॉ. मंजिरी मोरे, शिक्षण प्रसारक मंडळाचे पेट्रन कौन्सिल मेंबर दौलत देसाई, प्रशासन अधिकारी श्री. पृथ्वी मोरे, प्रा. एम. एल. धनवडे, प्रा. रविंद्र सुतार, प्रा. एस. आर. घाटगे, प्रा. एस. एन. बोरवडेकर तसेच सर्व प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचालन प्रा.डॉ. पी. डी. आवटे यांनी केले आभार उपप्राचार्य एन. टी. पाटील यांनी मानले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!