प्रारूप प्रभाग रचना योग्य व स्वागतार्ह – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शहर प्रमुख सुनील मोदी
कोल्हापूर
महानगरपालिकेने काल जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार २० प्रभागातून एकूण ८१ नगरसेवकांची निवड होणार आहे. या प्रारूप रचनेचा अभ्यास केला असता, महानगरपालिका प्रशासनाने योग्य लोकसंख्येचे संतुलन राखत, एकत्रित भागांचे नियोजन करून नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधांचा विचार केला आहे.
सत्तारूढ महायुतीचे राजकीय डाव उधळून लावत प्रशासनाने कोणताही दबाव न घेता न्याय्य व विवेकपूर्ण प्रारूप प्रभाग रचना केली आहे. या ठोस व पारदर्शक निर्णयासाठी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महापालिका प्रशासक व अधिकारी यांचे हार्दिक अभिनंदन व आभार मानतो.
आगामी निवडणुकीत कोल्हापूरकर जनतेच्या ठाम समर्थनावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाविकास आघाडी निश्चितच अधिकाधिक जागा जिंकून महापौरपद मिळवेल, असा आम्हाला विश्वास आहे.