कॅश टंचाईमुळे डिजिटल पेमेंट, चेक क्लिअरिंग, मोबाईल बँकिंग, क्यू. आर. कोड सुविधा वापरा…..

Spread the news

कॅश टंचाईमुळे डिजिटल पेमेंट, चेक क्लिअरिंग, मोबाईल बँकिंग, क्यू. आर. कोड सुविधा वापरा…..

­

 

केडीसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे यांचे आवाहन….

  •  

कोल्हापूर, दि. १३:
रोख रकमेच्या म्हणजेच कॅश टंचाईमुळे बँकेच्या ग्राहकांनी डिजिटल पेमेंट, चेक क्लिअरिंग, मोबाईल बँकिंग, क्यू. आर. कोड सुविधा वापराव्यात, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे यांनी केले आहे. रोख रकमेचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी बँकेमार्फत योग्य ती पावले तातडीने उचलण्यात येत आहेत, असेही त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

या प्रसिद्धी पत्रकात श्री. शिंदे यांनी पुढे म्हटले आहे, केडीसीसी बँकेला करन्सी चेस्टकडून सध्या रोख रकमेचा (Cash) पुरवठा मर्यादित प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे बँकेच्या सर्वच शाखांमध्ये ग्राहकांना आवश्यक त्या प्रमाणात रोख रक्कम तत्काळ उपलब्ध करून देण्यात अडचणी येत आहेत. तरी, पुरेशा प्रमाणात रोख रक्कम उपलब्ध होईपर्यंत यु. पी. आय., एन. ई. एफ. टी., आर. टी. जी. एस., या डिजिटल पेमेंट, चेक क्लिअरिंग सुविधा, मोबाईल बँकिंग, क्यू. आर. कोड या सुविधांचा ग्राहकांनी वापर करावा.

दरम्यान; बँकेमार्फत रोख रकमेचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले तातडीने उचलण्यात येत आहेत. परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे. ग्राहकांनी सहकार्य करावे व गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत…..

चौकट……
रोखीचे व्यवहार जास्त….
बँकेच्या ग्रामीण भागातील १९१ शाखांमार्फत शासनाच्या विविध अनुदानाची अनुदाने, ऊसबिले, दुधबिले, पतसंस्था व बचत गटांचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत असतात. या सर्व व्यवहारांसाठी विशेषता रोख रकमेचीच मागणी असते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!