शाश्वत दुग्ध व्यवसायासाठी नवनिर्मित तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज
– अरुण डोंगळे
चेअरमन, गोकुळ दूध संघ
कोल्हापूर, ता.०३: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व कंपाऊंड लाइव्हस्टॉक फीड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया, मुंबई (क्लाफ्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शाश्वत दुग्ध व्यवसाय व नवनिर्मित तंत्रज्ञान’ या विषयावरील एक दिवशीय परिसंवाद कार्यशाळा रेसिडेन्सी क्लब, कोल्हापूर येथे संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते संचालक नवीद मुश्रीफ, अजित नरके व संघाचे संचालक, क्लाफ्मा ऑफ इंडियाचे चेअरमन दिव्या कुमार गुलाटी यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.०२/०५/२०२५ इ.रोजी संपन्न झाले.
यावेळी मार्गदर्शन करताना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, दुग्धव्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी दुग्ध व्यवसायातील आव्हाने बहुआयामी दृष्टिकोनाच्या मार्गाने हाताळून दूध उत्पादन वाढीसाठी व जनावरांचे प्रजनन यासाठी संतुलित आहाराची उपलब्धता सुनिश्चित करून शाश्वत दुग्ध व्यवसायासाठी नवनिर्मित तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. या परिसंवाद कार्यशाळेमुळे दुग्ध व्यवसायातील नवीन तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि व्यवस्थापनाच्या पद्धतीची माहिती मिळाली या माहितीचा उपयोग दूध उत्पादकांच्या उन्नतीसाठी होईल असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी क्लाप्मा ऑफ इंडियाचे चेअरमन दिव्या कुमार गुलाटी यांनी कंपाऊंड फीड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (क्लाफ्मा) ऑफ इंडिया या संस्थेची माहिती देताना सांगितले की क्लाफ्मा हि पशुखाद्य निर्मिती करणाऱ्या कारखान्यांची देशपातळीवरील संस्था असून जनावरांच्या संतुलित आहारा बाबत जनजागृतीसाठी असे परिसंवाद देशभर आयोजित करते.
यावेळी आयुर्वेदिक औषधोपचार, ताण तणाव व्यवस्थापन आणि टी.एम.आर.चे फायदे, पंजाब मधील प्रगत दुग्धव्यवसायाची यशोगाथा, म्हैस संगोपन, पशुपोषण आहार व्यवस्थापन, छोटे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सायलेज निर्मिती व वापर या विषयावर तज्ञांनी मार्गदर्शन केले. परिसंवादाच्या शेवटच्या चर्चासत्रात उपस्थितीत दूध उत्पादकांनी मांडलेल्या दुग्ध व्यवसायातील समस्यावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये दुग्ध व्यवसायमध्ये काम करणारे तज्ञ डॉक्टर, अधिकारी, दूध उत्पादक, महिला या चर्चासत्रामध्ये सहभागी झाले होते.
याप्रसंगी संघाचे संचालक नवीद मुश्रीफ, अजित नरके, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले यांनी मनोगते व्यक्त केली. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत क्लाप्मा ऑफ इंडियाचे माजी चेअरमन एस.व्ही.भावे यांनी केले. तर या परिसंवाद कार्यशाळेच्या प्रायोजक व तज्ञ वक्ते यांना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तर आभार डॉ.सैकत साहा यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एम.पी.पाटील यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाप्रसंगी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, क्लाफ्मा ऑफ इंडियाचे चेअरमन दिव्या कुमार गुलाटी, गोकुळचे संचालक अजित नरके, नवीद मुश्रीफ, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, नंदकुमार ढेंगे, बयाजी शेळके, युवराज पाटील, एस. व्ही. भावे, पश्चिम विभागाचे अध्यक्ष डॉ.सैकेत साहा, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, डॉ.एस.व्ही.आंबे, डॉ.प्रितपाल सिंग, डॉ.मनिष शर्मा, डॉ.नितीन मार्कडेय, डॉ.प्रशांत शिंदे, डॉ.चंद्रशेखर पांडे, डॉ.प्रदीप महाजन, डॉ.विजय मगरे, डॉ.श्रीहर्ष के.व्ही.एस.,डॉ.सैकत साहा, डॉ.प्रकाश साळुंके, डॉ.व्ही.डी.पाटील तसेच देशातील पशुखाद्य निर्मिती करण्याऱ्या कारखान्यांचे प्रतिनिधी, संघाचे अधिकारी आणि दूध उत्पादक, महिला आदि मान्यवर उपस्थित होते.
—————————————————————————————————-
फोटो ओळ – यावेळी मार्गदर्शन करताना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, क्लाफ्मा ऑफ इंडियाचे चेअरमन दिव्या कुमार गुलाटी, गोकुळचे संचालक अजित नरके, नवीद मुश्रीफ, संभाजी पाटील, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले