Spread the news

महाराष्ट्रातील काम बंद आंदोलन दिवस दुसरा राज्यातील काम बंद आंदोलनाचे लोण आता २२ जिल्हा मध्ये

­

 

महाराष्ट्र राज्य अर्थमुव्हर्स मशिनरी संघटना यांचा आंदोलनास जाहीर पाठिंबा*.

  •  

कोल्हापूर
महाराष्ट्रातील सर्व विभागाकडील ९६ हजार कोटींची देयके प्रलंबित आहेत ते शासनाकडून तातडीने मिळावे व इतर अनेक कामामधील अडचणी, प्रश्न , समस्या याबाबत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, राज्य हाॅटमिक्स असोसिएशन, राज्य मजुर संस्था यांनी राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री व संबंधीत खात्याचे मंत्री यांना जवळ ३ फ्रेबुवारी,२६ फेब्रुवारी, ९ मार्च ४ एप्रिल असे चार पत्र दिले संबंधित विषयावर बैठक घ्यावी मार्ग काढावा असे स्पष्ट केले होते.तर याबाबत विचार न झाल्यास मंगळवार दि ७ एप्रिल २०२६ पासुन राज्यातील सर्व‌ विकास कामे बंद होतील असा इशारा दिला होता.

यानुसार राज्यात मंगळवार ७ एप्रिल रोजी १५ जिल्हा मध्ये हे काम बंद आंदोलन सुरू झाले होते, आज मंगळवार दि ८/४/२६ रोजी यात भर होऊन आतापर्यंत सदर २२ जिल्हा मध्ये काम बंद चे लोण पोहचले आहे,तसेच आता डांबर, पेट्रोल, डिझेल व स्थापत्य अभियांत्रिकी वस्तू महाग झाले आहेत तसेच सदर कामासाठी शासनाचे दर हे तीन वर्षांपासून तेच आहेत यामुळे आता कोणीही कंत्राटदार काम करू शकणार नाही.

यात आज महत्त्वाची गोष्ट व घटना म्हणजे महाराष्ट्र राज्य अर्थमुव्हर्स मशिनरी संघटना ( *State Earthmovers Machinary and Equipment Association) ने* राज्यातील कंत्राटदार यांचे काम बंद आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे याचे कारण म्हणजे जी मशिनरी कंत्राटदार वापरतात यांचे बिल शासनानै कंत्राटदार यांस न‌ दिल्याने ते पुढील गोष्टी कंत्राटदार करच शकत नाही. याचाच अर्थ यामुळे राज्यातील ८ ते १० विभागांची विकासाची कामे बंद पडतील यामध्ये राज्य रस्ते, जिल्हा रस्ता, ग्रामीण मार्ग,सरकारी कार्यालये व इमारती दुरुस्ती,पुलांचे बांधकामे,जलजीवन मिशन अंतर्गत सगळे गावातील पाणीपुरवठांची कामे , आदिवासी व पर्यटन विभागांची व इतर अनेक विभाग कामे बंद पडुन जवळपास १ लक्ष कंत्राटदार व त्यावर उपजीविका असणारे करोडो मजुर,वाहतुकदार, मटेरियल ओनर अशा अनेक गोष्टी यामध्ये सापडणार आहे.अशी माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार चे राज्य अध्यक्ष इंजि मिलिंद भोसले, सुनील नागराळे,संजय मैद यांनी आज प्रसिद्धीस दिली आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!