Spread the news

*कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसाठी शेंडा पार्क येथे दोन हेक्टर जागा हस्तांतरित – आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नांना यश*
कोल्हापुरातील भाऊसिंगजी रोडवर कोल्हापूर महानगरपालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत आहे. या संस्थानकालीन इमारतीतून महापालिकेचा स्थापनेपासून कारभार चालवला जात आहे. कालपरत्वे इमारत अपुरी पडू लागल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेसाठी नव्या प्रशासकीय इमारतीची मागणी होत होती. शहराचा वाढत जाणारा विस्तार आणि लोकसंख्येचा विचार करता शेंडा पार्क येथील कृषी विद्यापीठाच्या जागेमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात यावी अशी मागणी आमदार अमल महाडिक यांनी पालकमंत्री, सह पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शेंडा पार्क इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या गट नंबर 602/2 मधील दोन हेक्टर जागा कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी राखीव ठेवण्याचे आदेश पारित केले. 6 फेब्रुवारी 2026 रोजी हे आदेश पारित केल्यानंतर सदर जमिनीच्या सातबारा पत्रकात इतर हक्कांमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या नवीन प्रशस्त प्रशासकीय इमारतीच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
पाच एकरांच्या विस्तीर्ण परिसरामध्ये महानगरपालिकेची प्रशासकीय इमारत, पार्किंग, नागरी सुविधा केंद्र, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची दालने तसेच सभागृह उभारण्यात येणार असून लवकरच यासंबंधीची निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या नूतन प्रशासकी इमारतीसाठी शेंडा पार्क येथे जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार अमल महाडिक यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरीताई मिसाळ आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आभार मानले आहेत.
*चौकट*
कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे विविध प्रशासकीय इमारतींची उभारणी करण्यात येत आहे. याच ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी तसेच भविष्यातील सर्किट बेंच आणि आयटी पार्क उभारण्यात येणार असल्यामुळे महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी हे ठिकाण अगदी योग्य म्हणावे लागेल. नव्या प्रशासकी इमारतीत महापालिकेच्या सर्व विभागांचे कामकाज एकाच छताखाली चालणार असल्यामुळे नागरिकांची सोय होणार आहे.
– आमदार अमल महादेवराव महाडिक
– कोल्हापूर दक्षिण विधानसभा

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!