शिंगणापूर, नागदेववाडी पंपिंग स्टेशनसाठी रु.३ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर : आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती* *पाणी पुरवठ्याची पर्यायी यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी आमदार क्षीरसागर यांचा पाठपुरावा*

Spread the news

*शिंगणापूर, नागदेववाडी पंपिंग स्टेशनसाठी रु.३ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर : आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती*

 

 

  •  

*पाणी पुरवठ्याची पर्यायी यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी आमदार क्षीरसागर यांचा पाठपुरावा*

कोल्हापूर दि.११ : ऐन सणासुदीच्या काळात शहरातील माताभगिनी घागरी घेवून पाण्यासाठी वणवण फिरावे लागले होते. या घटनेची गांभीर्याने दखल घेवून आमदार राजेश क्षीरसागर यांनी थेट शिंगणापूर येथील पंपिंग स्टेशनला दि.३० ऑगस्ट २०२५ रोजी भेट देवून नव्या योजनेवर अवलंबून न राहता जुन्या पाणी पुरवठा योजना पर्याय म्हणून सज्ज ठेवण्याच्या सूचना महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. यावेळी शिंगणापूर व नागदेववाडी वॉटर पंपिंगकडे नवीन पम्प आवश्यक असल्याची मागणी महानगरपालिका अधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार आवश्यक प्रस्तावही जिल्हा प्रशासनाकडे सादर केल्याचे सांगितले होते. यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी शहरातील नव्या योजनेला पर्याय म्हणून जुन्या पाणी पुरवठा योजनाही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असणे आवश्यक असून त्याकरिता आवश्यक निधी देण्याची मागणी महापालिकेतील बैठकीत पालकमंत्री ना.प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली होती.

त्यानुसार सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२५ – २६ महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान (जिल्हास्तर) योजनेतून शहर पाणीपुरवठा विभागाने प्रस्तावित केलेल्या दोन कामांना रु.३ कोटी ६० लाखांचा निधी नगरपालिका प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांनी मंजूर केला आहे. शिंगणापूर रॉ वॉटर पंपिंगकडे नवीन पंप सेट पुरविणे, उभारणी करणे व कार्यान्वित करणे या कामासाठी रु.२ कोटी ३० लाख आणि नागदेववाडी रॉ वॉटर पंपिंगकडे नवीन पंप सेट पुरविणे, उभारणी करणे व कार्यान्वित करणे या कामासाठी रु.१ कोटी ३० लाख निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

ते पुढे म्हणाले कि, एक योजना कार्यान्वित झाली म्हणून शहरातील जुन्या यंत्रणांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. परंतु, एका योजनेवर अवलंबून न राहता शहरातील जुन्या पाणी पुरवठा योजनाही पर्याय म्हणून पूर्ण क्षमतेने कार्यानिव्त असणे आवश्यक होते. याकरिता अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. या यंत्रणा सक्षम करण्यासाठी आवश्यक निधीची मागणी पालकमंत्री ना.प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली असता त्यांनी तात्काळ याकरिता निधी मंजुरी दिली. त्यामुळे पालकमंत्री ना.प्रकाश आबिटकर यांचेही आभार.. आगामी काळात शहरवासीयांच्या प्रत्येक प्रश्नाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देवून, प्रशासनाशी समन्वय ठेवून तात्काळ उपाययोजना करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!