गवळी समाजाची शताब्दी महोत्सवी इमारत एकतेचे, परिश्रमाचे आणि प्रगतीच्या ध्यासाचे प्रतिक : आमदार राजेश क्षीरसागर

Spread the news

गवळी समाजाची शताब्दी महोत्सवी इमारत एकतेचे, परिश्रमाचे आणि प्रगतीच्या ध्यासाचे प्रतिक : आमदार राजेश क्षीरसागर

­

 

कोल्हापुरातील वीरशैव लिंगायत गवळी समाज कोल्हापूर यांच्या शताब्दी महोत्सवी इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न

  •  

कोल्हापूर दि.२१ : कोल्हापूरच्या सामाजिक जडणघडणीत गवळी समाजाचे योगदान मोठे आहे. वीरशैव लिंगायत गवळी समाज शताब्दी महोत्सवी इमारत ही समाजाच्या शंभर वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचे आणि भविष्यातील प्रगतीच्या ध्यासाचे जिवंत प्रतीक आहे. ही इमारत केवळ एक वास्तू नसून समाजाच्या एकतेचा आणि अथक परिश्रमांचा पुरावा आहे. समाजातील पूर्वजांनी आणि कार्यकर्त्यांनी गेल्या १०० वर्षांत केलेल्या संघर्षाचे आणि कष्टाचे हे मूर्त स्वरूप आहे. ही इमारत समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचे केंद्र असून, विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत भविष्यातील पिढीसाठी ती मार्गदर्शक ठरेल, असे गौरवोद्गार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी काढले.

कोल्हापुरातील वीरशैव लिंगायत गवळी समाज कोल्हापूर यांच्या शताब्दी महोत्सवी इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या अत्याधुनिक वास्तूच्या नूतनीकरणासाठी स्वखर्चातून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल समस्त समाजाच्या वतीने आमदार राजेश क्षीरसागर यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले कि, कोल्हापूरच्या सामाजिक जडणघडणीत गवळी समाजाचे योगदान मोठे आहे, आणि ही शताब्दी महोत्सवी इमारत त्या वारशाचा सन्मान करते. वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या या भव्य इमारतीचे उद्घाटन करताना मनापासून आनंद होत आहे. समाज बांधव नेहमीच माझ्या सामाजिक आणी राजकीय वाटचालीत माझ्यासोबत खंबीरपणे उभे असल्याचे नेहमीच समाधान आहे. ही इमारत फक्त वीट आणि सिमेंटची रचना नाही, तर आपल्या समाजाच्या एकतेचे, परिश्रमाचे आणि प्रगतीच्या ध्यासाचे प्रतीक आहे. अनेक वर्षांची मेहनत, संघर्ष आणि एकजुटीमुळे आज आपण हा सुवर्ण क्षण अनुभवत आहोत. वीरशैव गवळी समाज हा नेहमीच कष्टाळू, प्रामाणिक आणि संस्कृती जपणारा समाज म्हणून ओळखला जातो. समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, व्यवसाय आणि सामाजिक बांधिलकी या तीन गोष्टींवर भर देणे ही काळाची गरज आहे. ही इमारत त्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी उपस्थित स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेविका सौ.मंगल साळोखे, नगरसेविका सौ.दिपा ठाणेकर, रमेश आंबरखाने, किरण निळकुंदे, शिवाजी तोडले, भारत सदगुरु, गणेश मंगानूर, सौ.अंजूताई पतंगराये, संदिप ढणाल, बबनराव गवळी, विकी मोतीपुरे, सुनिल गाताडे, राहुल नष्टे, इंद्रजीत आडगुळे, प्रशांत गवळी, दादासाहेब गवळी, योगिराज गवळी, गणेश मोतीपुरे, शैलेश गवळी, योगेश मारटकर, परशराम तोडले, विनायक गवळी आदी गवळी समाजातील महिला व समाजबांधव उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!