- घरफाळा दंडामध्ये 30 सप्टेंबर अखेर 90 टक्के सवलत
कोल्हापूर ता.03 : शहरातील मिळकतकर थकबाकीदारांनी थकबाकीचे दंड व्याजामध्ये चालू मागणीसह थकबाकीची रक्कम एकरकमी भरल्यास त्यावरील दंडव्याजामध्ये महानगरपालिकेच्यावतीने सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे. हि सवलत योजना दि.03 सप्टेंबर ते 31 ऑक्टोंबर 2025 या कालावधीकरीता प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मंजुरीने जाहिर करण्यात आली आहे. यामध्ये निवासी, अनिवासी मिळकतीसाठी दि.03 ते 30 सप्टेंबर 2025 अखेर 90 टक्के व दि.1 ते 31 ऑक्टोंबर 2025 अखेर 75 टक्के सवलत दिली जाणार आहे.
मालमत्ता कराची (घरफाळा) रक्कम महानगरपालिकेच्या सर्व नागरी सुविधा केंद्रात जमा करण्याची सुविधा आहे. मिळकत कराची रक्कम ऑनलाईन भरणा करण्यासाठी महानगरपालिकेच्या https://web.kolhapurcorporation.gov.in/ या वेबसाईटवर व अँड्रॉइड मोबाईल ॲपवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच नागरी सुविधा केंद्रात किओस्क (Kiosk) यंत्रावर ऑनलाईन पेंमेंटची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त गुगल पे, फोन पे, ॲमेझोन पे यांसारखे यूपीआय वॉलेट्सव्दारे मिळकत कर भरणा करतेवेळी प्रथम रिफ्रेश पर्यायाचा वापर करणे आवश्यक आहे. सदरचे ॲप रिफ्रेश न केल्यास कर व दंडसूट भरणा रक्कम मध्ये फरक पडणेची शक्यता असते. त्यामुळे कराची रक्कम भरतांना ॲप रिफ्रेश करण्याची जबाबदारी मिळकतधारकांची राहिल याची नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे नागरीकांनी आपल्या मिळकत कराची थकीत तसेच चालू आर्थिक वर्षाची एकूण रक्कम (दंडासहित) जाणून घेण्यासाठी https://propertytax.kolhapurcorporation.gov.in/KMCOnlinePG/NEWPropSearchOnly.aspx या लिकंचा वापर करुन पाहावी.
तरी थकीत रक्कमेवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनिमातील तरतूदीनूसार दरमहा 2 टक्के दंड, जप्ती, मिळकतींवर बोजा नोंद होणे सारखे कटू प्रसंग टाळण्यासाठी नागरीकांनी आपली मिळकत कराची रक्कम आजच जमा करून या सवलत योजनेचा लाभ घ्यावा. तसेच या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी थकीत कराचा एकरक्कमी भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
0000000000000