*घरगुती गौरी गणपती विसर्जनेसाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज*

Spread the news

कोल्हापूर ता.31 – घरगुती गौरी गणपती विसर्जनाकरिता महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून महापालिकेच्यावतीने विसर्जनाच्या कामकाजासाठी अधिकाऱ्यांबरोबरच अडीच हजाराहून अधिक कर्मचा-यांच्या विविध ठिकाणी नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. इराणी खण येथे गणेश मुर्ती विसर्जनासाठी मंगळवारी स्वयंचलित यंत्र बसविण्यात आले असून गणेश मुर्ती संकलनासाठी 205 टँम्पो 480 हमाल, 7 जे.सी.बी., 7 डंपर, 8 टॅक्टर, 4 पाण्याचे टँकर, 2 बुम, 5 ॲम्बुलन्स व 5 साधे तराफे व 10 फलोटींगचे तराफे, यावर्षी पहिल्यांदाच 1 क्रेन अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवानही विसर्जनस्थळी सुरक्षीततेसाठी सर्व साधनसामुग्रीसह तैनात करण्यात येत असून विद्युत विभागाकडून विसर्जन ठिकाणी मोठी लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्यावतीने विसर्जन ठिकाणांची साफसफाई करण्यासाठी आरोग्य निरिक्षकांच्या 13 टिम तयार करण्यात आल्या आहेत. विर्सजनाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. पंचगंगा नदी तसेच शहर परिसरातील तलावांचे प्रदूषण होऊ नये म्हणून महापालिकेच्यावतीने शहरात सर्व प्रभागात विविध ठिकाणी 160 गणेश विसर्जन कुंड व निर्माल्य कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे. ही सर्व निर्माल्य कुंडे बुधवारी रात्रीपर्यंत चारही विभागीय कार्यालयात लावून त्यामध्ये पाणी भरुन ठेवण्यात आले आहे.

पवडी विभागाकडून नागरिकांनी विसर्जन कुंडामध्ये विर्सजन केलेल्या गणेशमुर्ती एकत्र करुन टॅम्पोमधून वाहतूक करुन इराणी खणीमध्ये विसर्जीत करणेचे व्यवस्था महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच विर्सजन स्थळाजवळील निर्माल्य गोळा करणेचे काम करण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने 13 आरोग्य निरिक्षकांच्या नियंत्राखाली त्या त्या प्रभागातील प्रत्येक विसर्जन कुंडाच्या ठिकाणी प्रत्येकी 4 प्रमाणे 2 शिफ्टमध्ये कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. संकलित करण्यात आलेले निर्माल्य खत तयार करण्यासाठी पुईखडी, बापट कॅम्प, बावडा, दुधाळी, आयसोलेश हॉस्पीटल येथे स्वतंत्र खड्डा करुन सेंद्रीय खत तयार करण्यात येणार आहे. याठिकाणी एकटी, संस्थेच्या महिलांच्याकडून निर्माल्याचे विलगीकरण करुन खत निर्मितीचे काम करण्यात येणार आहे. यासाठी अवनी, एकटी, वसुंधरा व इतर सेवाभावी संस्थेच्या 150 महिला सदस्या हे काम करणार आहेत. तरी शहरातील नागरिकांनी महापालिकेच्यावतीने व्यवस्था करण्यात आलेल्या कृत्रिम कुंडामध्येच गणेशमुर्ती व निर्माल्य देऊन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.
000000000000000000

  •  

You may also like

error: Content is protected !!