केआयटीच्या विश्व तांबे चे आशियाई पॅरा युथ गेम्स मध्ये घवघवीत यश
दोन रजत पथकांची कमाई करत राष्ट्रीय मानांकन यादीत अव्वल
येथील केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाच्या अंतिम वर्ष मेकॅनिकल विभागातील विद्यार्थी विश्व तांबे याने दि.१०-१२ डिसेंबर २५ रोजी दुबई येथे संपन्न झालेल्या आशियाई पॅरा युथ गेम्स मध्ये यशस्वी सहभाग नोंदवला.
टेबल टेनिस या खेळामध्ये त्याने पुरुष एकेरी क्लास १० मध्ये व मिक्स डबल क्लास २० मध्ये दोन रजत पदकांची कमाई केली. आज विश्व ताम्बेने वर्ल्ड रँक ४४ , यु.२३ वर्ल्ड रँक -१३ आणि राष्ट्रीय स्तरावरील मानांकन यादीमध्ये प्रथम मानांकनला गवसणी घातलेली आहे.केआयटीने महाविद्यालयात विद्यार्थ्यांमधील खेळ संस्कृतीला नेहमीच बळ दिले आहे.गेल्या २-३ वर्षात असे ५-६ विद्यार्थी खेळाडू आहेत ज्यांनी केआयटीच्या आर्थिक सहकार्याने व प्रोत्साहनाने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला गौरव प्राप्त करून दिला आहे.भविष्यातही क्षमतावान खेळाडूंना सर्वप्रकारचे सहकार्य केआयटी करेल असा विश्वास मा.संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी व्यक्त केला.
संस्थेचे सचिव श्री दीपक चौगुले, संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी त्याचे आज विशेष अभिनंदन केले. संस्थेचे अध्यक्ष श्री साजिद हुदली ,उपाध्यक्ष श्री सचिन मेनन अन्य विश्वस्त यांचे त्याला प्रोत्साहन लाभले. मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख डॉ. उदय भापकर,महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा.विजय रोकडे यांचे मोठे सहकार्य त्याला लाभले.
फोटो तपशिल:-आशियाई पॅरा युथ गेम्स मध्ये दोन रजत पदकांची कमाई केलेल्या विश्व तांबे यांचे अभिनंदन करताना केआयटी चे सचिव श्री.दीपक चौगुले, सोबत डावीकडून डॉ. मोहन वनरोट्टी व प्रा.विजय रोकडे.



