घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये “लिटरेचर फेस्ट 2025” उत्साहात साजरा

Spread the news

घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये “लिटरेचर फेस्ट 2025″ उत्साहात साजरा

 

  •  

 

 

अतिग्रे – येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या सीबीएसई डे बोर्डिंग विभागात ” इंक अँड इनसाईट लिटरेचर फेस्ट 2025″ मोठ्या उत्साहात १९ जुलै रोजी साजरा करण्यात आला. “हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणारा एक बहुभाषिक साहित्य मेळा आहे”. असे मत बालसाहित्यिक नीलम माणगावे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी लेखिका डॉ. राजश्री राजगोंडा पाटील, लेखिका निलम माणगावे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ. एच. एम. नवीन, डे बोर्डिंग विभागाचे प्राचार्य श्री. अस्कर अली उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण ठरले पाच भाषांतील (मराठी, संस्कृत, हिंदी, इंग्रजी व फ्रेंच) गीत, ज्यात भाषिक आणि सांस्कृतिक समृद्धीचं दर्शन घडवण्यात आलं.

हिंदी विभागाच्या विद्यार्थांनी कवी संमेलनातून नऊरसांवर आधारित कविता सादर केल्या. नंतर इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली विनोदी कविता आणि “कॅरेक्टर परेड” यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.
मराठी विभागाच्या नटसम्राट या नाटकाने उपस्थितांचे डोळे पाणावले. पालक व मुलांमधील नात्यांचे बारकावे, वृद्धापकाळातील दुर्लक्षिततेचे वास्तव नाटकातून मांडले. यानंतर कथाकथन सत्र देखील रंगले.
कन्नड विभागाने भावनात्मक कविता सादर करत प्रादेशिक रंग भरले.
या वेळी शाळेतील २८ नवोदित बाल लेखकांना गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचा खास आकर्षण ठरले “शब्दधारा” या पुस्तकाचे प्रकाशन, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे साहित्यिक लेखन आणि सर्जनशीलता अंतर्भूत होती.
शेवटी लेखिका राजश्री राजगोंडा पाटील व लेखिका निलम माणगावे यांच्या प्रेरणादायी भाषणांनी विद्यार्थ्यांना वाचन व लेखनाची प्रेरणा दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिक्षक, विद्यार्थी यांच्या अथक परिश्रमामुळे लिटरेचर फेस्टिवल उत्कृष्ट झाल्याचे कौतुकाचे शब्द प्राचार्य अस्कर अली यांनी व्यक्त केले. लिटरेचर फेस्टिवलमध्ये सहभागी विद्यार्थी व शिक्षकांचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालिका सस्मिता मोहंती यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!