*’ घुंगुरमाळा ‘ काव्यसंग्रहाचे शनिवारी प्रकाशन*
कोल्हापूर : येथील कवियित्री महानंदा मोहिते यांच्या ” घुंगुरमाळा’ काव्य संग्रहाचे प्रकाशन शनिवारी ( ता. १२) होणार आहे. शाहू स्मारक भवन ( मिनी हॉल) सायंकाळी चार वाजता खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.
ज्येष्ठ साहित्यिक श्रीराम पचिंद्रे, डॉ. रणधीर शिंदे, माई पब्लिकेशन्सच्या ममता सपकाळ, प्रकाशक पूजा भडांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन कवयित्री महानंदा मोहिते यांनी केले आहे.