थकितसह या वर्षीचे वेतनेतर अनुदान द्या : खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाची
कोल्हापूर दि. ११ : गतवर्षीच्या थकीतसह यावर्षीच्या वेतनेतर अनुदानाची मागणी शासनस्तरावर करावी अशी मागणी जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ.मीना शेंडकर यांच्याकडे महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या शिष्टमंडळाने केली.
. जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक अनुदानित शाळांचे गतवर्षीचे अनुदान शाळांना प्राप्त झालेली नाही. गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात राज्य शासनाकडे वेतनेतर अनुदान करण्यासाठी संपूर्ण अधिकार जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना देण्यात आले आहेत.तरी जिल्ह्यातील सर्व शाळांचे गतवर्षीचे व या वर्षीचे वेतनेतर अनुदानाची मागणी शासनस्तरावर करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शिस्तमंडळात खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे सल्लागार एम.डी.पाटील,विभागीय सचिव राजाराम संकपाळ, जिल्हा सचिव नितीन पानारी,शहराध्यक्ष संतोष पाटील,करवीर तालुका अध्यक्ष राज मेंगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.



