गोकुळश्री’ स्पर्धेत केर्ली च्‍या विश्वास कदम यांची म्‍हैस प्रथम तर रांगोळीचे युवराज चव्हाण यांची गाय प्रथम…!  

Spread the news

 

­

 

‘गोकुळश्री’ स्पर्धेत केर्ली च्‍या विश्वास कदम यांची म्‍हैस प्रथम तर रांगोळीचे युवराज चव्हाण यांची गाय प्रथम…!

  •  

 

कोल्‍हापूर,ता.०९: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) च्यावतीने दूध उत्‍पादन वाढीसाठी व उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देणेसाठी प्रत्‍येक वर्षी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी व म्‍हैशी करीता ‘गोकुळ श्री’ स्‍पर्धा घेणेत येते, सन २०२५-२६ मध्‍ये घेण्‍यात आलेल्‍या स्‍पर्धेमध्‍ये एकूण ११४ म्‍हैस व गाय दूध उत्‍पादकांनी उत्‍साहाने भाग घेतल्‍याने स्‍पर्धेत चुरस निर्माण झाली होती. सदरची स्‍पर्धा दिनांक २८/११/२०२५ इ.रोजी घेण्‍यात आली असून, त्‍यामध्‍ये श्री हनुमान सह. दूध व्‍याव. संस्‍था केर्ली ता. करवीर या संस्थेचे म्‍हैस दूध उत्‍पादक श्री. विश्वास यशवंत कदम यांच्‍या जाफराबादी जातीच्या म्‍हैशीने एका दिवसात सकाळ व सांयकाळ पाळीमध्ये एकूण २१ लिटर ९५५ मि.ली. इतके दूध देवून प्रथम क्रमांक मिळवला तर गायीमध्‍ये श्री कृष्ण सह. दूध व्‍याव. संस्‍था रांगोळी ता. हातकणंगले या संस्थेचे गाय दूध उत्‍पादक श्री. युवराज विठ्ठल चव्हाण यांच्‍या एच.एफ जातीच्या गायीने सकाळ व सांयकाळ पाळीमध्ये एकूण ३५ लिटर ८७० मि.ली. दूध देवून प्रथम क्रमांक मिळवला.

गोकुळशी संलग्‍न असणा-या सर्व प्राथमिक दूध संस्‍थांच्‍या सभासदांकरीता या स्‍पर्धा प्रतिवर्षी घेण्‍यात येतात. गोकुळ श्री’स्‍पर्धेचा प्रमुख उद्देश दूध उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देणे, जातिवंत जनावरे खरेदी करणे, जनावरांचे संगोपन सुधारणे, जनावरांमध्‍ये दूध उत्‍पादन वाढवणे याचबरोबर दुग्‍ध व्यवसायामधुन दूध उत्‍पादकांना जास्‍तीत-जास्‍त लाभ करून देणे तसेच तरूण पिढीला या व्‍यवसायकडे आकर्षित करून दूध व्‍यवसाय वाढविणे हा आहे. गोकुळने ही स्‍पर्धा गेल्‍या ३२ वर्षापासून आपल्‍या कार्यक्षेत्रामध्‍ये सुरू केलेली आहे.

या स्पर्धा अत्यंत निकोप व व्यवस्थीत पार पाडण्यासाठी गोकुळच्या दूध संकलन विभागामार्फत स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असते. यासाठी स्थानिक गांव पातळीवरील प्राथमिक दूध संस्थेतील चेअरमन, सचिव, संचालकांचेही सहकार्य घेतले जाते. या स्पर्धेमुळे दूध उत्पादन वाढीबरोबरच गुणवत्तेमध्ये सुधारणा होण्यास मदत झाल्याचे दिसून आले आहे. तसेच या स्पर्धेमध्ये भाग घेणारे सर्व दूध उत्पादक व ज्‍यांनी प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेले दूध उत्‍पादक अभिनंदनास पात्र असून पुढील वर्षी जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी ‘गोकुळश्री’स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले आहे. दूध उत्पादकांचा या स्पर्धेतील वाढता सहभाग पाहता गोकुळच्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादक आपल्या जनावरांतील उत्पादन क्षमता वाढीसाठी प्रयत्नशील असल्‍याचे दिसून येते आहे.

 

 

 

 

 

स्‍पर्धेमध्‍ये १ ते ३ क्रमांक असलेले म्‍हैस व गाय उत्‍पादक स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे

 

सन २०२५-२६ मधील म्हैस गटातील विजेते दूध उत्पादक
अ.नं संस्थेचे नाव गाव तालुका स्पर्धकाचे नाव दिवसाचे दूध लि.मिली जनावर जात क्रमांक बक्षीस रक्कम
१. श्री हनुमान केर्ली करवीर श्री.विश्वास यशवंत कदम २१ लिटर     ९५५ मि.ली. जाफराबादी प्रथम ३५,०००
२. श्री लक्ष्मी लिंगनूर   क || नूल गडहिंग्लज श्री. विजय विठ्ठल दळवी २० लिटर ५२० मि.ली. जाफराबादी द्वितीय ३०,०००
३. श्री लक्ष्मी गडहिंग्लज गडहिंग्लज सौ.वंदना संजय जरळी १८ लिटर ७०० मी.ली. जाफराबादी तृतीय २५,०००

 

 

सन २०२५-२६ मधील गाय गटातील विजेते दूध उत्पादक
अ.नं संस्थेचे नाव गाव तालुका स्पर्धकाचे नाव दिवसाचे दूध लि.मिली जनावर जात क्रमांक बक्षीस रक्कम
१. श्री कृष्ण रांगोळी हातकणंगले श्री.युवराज विठ्ठल चव्हाण ३५ लिटर ८७० मि.ली. एच.एफ. प्रथम २५,०००
२. अष्टविनायक बोडकेनहट्टी बेळगाव श्री.महेश कल्लाप्पा तवनोजी ३५ लिटर ८२० मि.ली. एच.एफ. द्वितीय २०,०००
३. दत्त बेलवळे बु. कागल श्री.दिपक संभाजी सावेकर ३५ लिटर ७८० मि.ली. एच. एफ. तृतीय १५,०००

 

—————————————————————————————————-                                                                                             


Spread the news

You may also like

error: Content is protected !!