रोटरी व दर्पण फाउंडेशनच्या वतीने भव्य समुह नृत्य स्पर्धा
कोल्हापूर
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल आणि दर्पण फाउंडेशन , कोल्हापूर
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भव्य समूहनृत्य स्पर्धा( देशभक्तीपर आणि लोकनृत्य ) आयोजित करण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळेसाठी स्पर्धा मर्यादित आहेत. स्पर्धतील विजेत्यांना सात हजार, पाच हजार व तीन हजार असे रोख बक्षीस व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी २५ डिसेंबर पर्यंत नाव नोंदणी करावे असे आवाहन दर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष कुमार पाटील ( मो.नं. 9096413499) व रो.श्री.अभिजीत माने (91 98231 52996) यांनी केले आहे.



