श्री महालक्ष्मी अन्नछत्र तर्फे श्री अंबाबाई रथोत्सवानिमित्त भव्य रिल्स स्पर्धा
करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव गुरुवार दि. २ एप्रिल २०२६ रोजी साजरा होत आहे. या रथोत्सवानिमित्त श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट यांचे वतीने देवीच्या रथाच्या स्वागतासाठी भव्य आणि नयनरम्य अशी विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. ही रोषणाई हे या रथोत्सवाचे विशेष आकर्षण राहणार आहे. म्हणूनच श्री महालक्ष्मी अन्नछत्रच्या वतीने या रथोत्सवानिमित्त नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी भव्य रिल्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तरी इच्छुक स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. सर्वोत्तम रिल्स साठी खालीलप्रमाणे रोख स्वरूपात बक्षीस दिले जाईल.
*प्रथम क्रमांक : रु. ३, ०००/-
द्वितीय क्रमांक : रु. २, ०००/-
तृतीय क्रमांक : रु. १, ०००/-*
त्याचप्रमाणे सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
सर्व स्पर्धकांनी या रथोत्सवाचे आकर्षक रील बनवून श्री महालक्ष्मी अन्नछत्रच्या इंस्टाग्राम पेज ID – mahalaxmi_annachhatra_ बरोबर कोलॅबरेशन करावे. अधिक माहितीसाठी पुढील नंबर वर संपर्क साधावा.
प्रतीक गुरव
८२०८५८३६६३
टीप : सदर रील हे ५० सेकंदापर्यंतच असावे. सदर स्पर्धेसाठी आपली नावनोंदणी वरील व्हाट्सअप नंबर वर करावी.
* नियम व अटी लागू.





