*राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुकांच्या मुलाखतींना मोठा प्रतिसाद*
*आज दुसर्या दिवशी राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्यातील उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण*7
*कोल्हापूर, दि. ११:*
कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आज सलग दुसऱ्या दिवशी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना इच्छुकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजर्षी शाहू मार्केट यार्डातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील, चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, करवीरचे युवा नेते राहुल पाटील (भैय्या), कार्याध्यक्ष अनिलराव साळोखे, गोकुळ दूध संघाचे संचालक बाळासाहेब खाडे, किसनराव चौगुले, रणजीतसिंह पाटील, सुधीरभाऊ देसाई, पंडितराव केणे, विश्वनाथ कुंभार, पी. डी. धुंदरे, अभय देसाई, बाजार समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, अरुणराव कांबळे, कृष्णराव पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
आज दुसर्या दिवशी राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड या तालुक्यातील उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या. गोकुळ दूध संघाचा कार्यक्रम आज शिरोळमध्ये असल्यामुळे शिरोळ तालुक्याच्या व गडहिंग्लजमध्ये कुक्कुटपालन संस्थेच्या निवडणुका असल्यामुळे गडहिंग्लज तालुक्याच्या मुलाखती पुढे ढकलल्या आहेत. त्या लवकरच होणार आहेत.
मुलाखती झालेल्या प्रमुख इच्छुकांमध्ये विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील, उमेश भोईटे, राजेंद्र भाटले, सागर धुंदरे, अमृता डोंगळे, भाग्यश्री डोंगळे, स्नेहा किरूळकर, फत्तेसिंग भोसले- पाटील, कविता पाटील, भिकाजी एक्कल, विश्वनाथ कुंभार, रुपालीदेवी पाटील – कौलवकर, विश्वास हळदे, संग्राम कलिकते, राजनंदिनी पाटील, सुहासिनीदेवी केणे, स्नेहा देसाई, विद्या कुंभार, उज्वला देसाई, स्मिताराणी गुरव, सुनील कांबळे, विलास कांबळे, शिरीष देसाई, सुधीर देसाई, आदींचा समावेश आहे.
………
*कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुकांच्या मुलाखती पक्ष कार्यालयात झाल्या. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
=======



