Spread the news

वेतन बिले फारवार्ड न होणाऱ्या शाळांबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संच मान्यता दुरुस्तीसाठी टॅब ओपन करून देण्याची मा .शिक्षण आयुक्त व मा .शिक्षण संचालक (प्राथमिक ) यांच्याकडे मागणी : भरत रसाळे सर…

­

 

कोल्हापूर :संच मान्यतेनुसार दिसणारी पदे व शालार्थ मध्ये दाखवलेली पदे यात तफावत आहे तसेच शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार खाजगी प्राथ . शाळांमधील शिक्षकेतर कर्मचारी (लिपिक / सेवक )अतिरिक्त आहेत . पण टॅब मध्ये ही दुरुस्ती केलेली नाही . त्यामुळे अशा शाळांची वेतनाचे Bill फारवर्ड होत नाही या बाबत काल प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे येथील प्रशासकीय अधिकारी मा . प्रवीण गायकवाड साहेब यांच्या बरोबर चर्चा केलेली आहे .
त्यांनी अशा स्पेसिफिक अशा शाळांची माहिती मागितली आहे याबाबत काल मा . शिक्षणा – धिकारी शेंडकर मॅडम व वरिष्ठ लिपिक सचिन माळी यांच्या बरोबर बोलणे झाले आहे .
पण शाळांची माहिती पुणे संचालनालय कार्यालयाकडे पाठविणे पेक्षा ही प्रक्रिया प्रत्येक जिल्ह्यांच्या ठिकाणीच होण्यासाठी दोन दिवसा साठी टॅब ओपन करून द्यावा म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कॅम्प घेऊन बिले फॉरवर्ड न होणाऱ्या शाळांची त्रुटी दुरुस्त करून बिले फॉरवर्ड करण्याचा प्रश्न निकाली काढता येईल असा सारासार विचार करून संचमान्यता दुरुस्तीचा टॅब ओपन करून द्यावा अशी मागणी मा . शिक्षण आयुक्तसो व मा शिक्षण संचालक ( प्राथ . ) व मा प्रशासकीय अधिकारी . सो यांच्याकडे केलेली आहे .यावर लवकर निर्णय होईल व बिले फॉरवर्ड न होणाऱ्या शाळांचा प्रश्न निकाली निघेल अशा विश्वास वाटतो .

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!