- जगद्गुरू पंचाचार्य होमिओपॅथिक महाविद्यालयामध्ये “जागतिक होमिओपॅथी दिन” उत्साहात साजरा कोल्हापूर :
पंचाचार्य होमिओपॅथिकवैद्यकिय महाविद्यालयामध्ये १० एप्रिल जागतिकहोमिओपॅथी दिन व होमिओपॅथिचे जनक डॉ. सॅम्युअल हनिमान यांची २७० वी जयंती उत्साहात साजरी झाली. पंचाचार्य एज्युकेशन जगद्गुरू सोसायटीचे होमिओपॅथिक वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने रूक्मिणीनगर मधील ‘संजीवनी’ रूग्णालयात मोफत सर्वरोग निदान, औषधोपचार शिबिर आयोजीत केले होते.
सकाळी ९.०० वाजता डॉ. सॅम्युअल हनिमान यांच्या प्रतिमा पूजनाने शिबीराचे औपचारिक उद्घाटन जेष्ठ होमिओपॅथिक तज्ञ डॉ. एम. आर. कुलकर्णी यांचे शुभहस्ते झाले. “शिक्षण अध्यापन आणि संशोधन” या जागतिक होमिओपॅथी दिवसाच्या संकल्पनेवर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
‘जगभरातील होमिओपॅथी चिकीत्साप्रणालीची सध्यस्थिती’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना होमिओपॅथिक तज्ञ डॉ. संतोष रानडे म्हणाले की होमिओपॅथीचा जन्म जर्मनीमध्ये झाला असला तरी ही चिकीत्साप्रणाली भारतामध्ये खूप लोकप्रिय आहे. तसेच विविध देशांत होमिओपॅथी चिकीत्साप्रणालीस मागणी असल्यामुळे आता सर्व देशात होमिओपॅथी औषधोपचार रूग्णांना मिळत आहेत. होमिओपॅथीमुळे बऱ्याच प्रमाणात शस्त्रक्रिया देखील टाळता येतात. होमिओपॅथी जगातील दुसऱ्या क्रमांकाची औषधप्रणाली असून कोवीड नियंत्रणामध्ये आणण्यास होमिओपॅथीचे योगदान लक्षणिय ठरले. निरोगी आरोग्यासाठी अॅलोपॅथी, आयुर्वेद व होमिओपॅथीसह जगातील इतर प्रभावी औषधप्रणाली यांचे एकत्रितपणे संशोधन होणे आजची गरज बनली आहे.
डॉ. सुनेत्रा शिराळे यांनी प्रास्ताविकामध्ये २०२५ च्या “शिक्षण, अध्यापन आणि संशोधन” या संकल्पनेबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमास प्राचार्य डॉ. राजकुमार पाटील, डॉ. रविकुमार जाधव, डॉ. सुहास पाटील, डॉ. फरजाना मुकादम, डॉ. सुजाता कामिरे, डॉ. मिलींद गायकवाड, डॉ. सचिन कुलकर्णी, डॉ. दिपाली पाटील, डॉ. सुनेत्रा शिराळे, डॉ. वर्षा पाटील, डॉ. रूपाली पाटील, डॉ. सचिन मगदूम, डॉ. महेश पटेल, डॉ. सुचेता मोरे, डॉ. रितू सुतार, डॉ. श्रध्दा काकडे, डॉ. चंद्रकांत मुळे इत्यादींसह सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ‘संजीवनी’ रूग्णालयामध्ये दि. ३० एप्रिल २०२५ पर्यंत सर्व रक्त चाचण्या ३०% कमी दरात करण्यात येणार असून सर्वसाधारण शस्त्रक्रिया व औषधोपचार पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.