जनसुराज्य शक्ति पक्षाच्या कोल्हापूर महानगर पालिका उमेदवार संवाद मेळावा आज पार पडला.
पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याच्या उद्देश उमेदवाराने आपले मत मांडलेत
त्याला उद्देशून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री संमितदादा कदम यानी शहराच्या विकास कामासाठी व पक्ष वाढवणार्या कार्यकर्त्यांला विविध योजनेच्या व निधीच्या माध्यमातून संपुर्ण सहकार्य करु. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना विविध शासकीय समितीत व पक्षाचे सन्माननीय पद देण्याचं आश्वासन दिले.
मा. आमदार डोॅ. श्री विनयजी कोरे सावकर साहेबानी मान्यता देत कोल्हापूर शहराचा विकासाच्या बाबतीत मा. कोरे साहेबानी आपला विकासात्मक द्रष्टीकोणातुन मांडला. महिलां सक्षमीकरणा साठी छोट्या छोट्या ग्रहउद्योगाच्या व बचतगटाच्या माध्यमातून उत्पन्न होणाऱ्या वस्तुसाठी मोठा आपला बाझार उभा करण्याची संकल्पना मांडली.
कोल्हापूर शहरातील पूर्वीच्या नद्यांचे आज नाले झाले आहेत त्या पूर्ववत नद्यांचे स्वरुप देण्यास मा.श्री कोरे साहेब प्रयत्न करत आहेत.
कोल्हापूर मद्ये येणाऱ्या पुर परिस्थितीत नागरिकांना होणाऱ्या आडचीतुन मार्ग काढण्यासाठी
पंचगंगा नदी मध्ये वेघळा प्रकल्पांवर काम करत आहोत लवकरच त्याचा मार्ग निघेल अशी खात्री दिली.
बरेच वर्षा पासुन कोल्हापूर शहराचा विकास हा थांबलाय आणी ते जनसुराज्य शक्ति पक्षाच्या माध्यमातून आपण सर्वजण मिळून करुया ही अपेक्षा कार्यकर्ताच्या समोर मांडली.





