जिल्हा मजूर संघात राजकीय भूकंप
दहा संचालकांचे तडकाफडकी राजीनामे
कोल्हापूर
जिल्हा मजूर सहकारी संस्थांचा संघ लि., कोल्हापूर या संघाच्या कारभारातील गंभीर अनियमितता, मनमानी कारभार व गैरव्यवहार यामुळे संघाच्या १५ संचालकांपैकी तब्बल १० संचालकांनी आपले सामूहिक राजीनामे सादर केले आहेत.
मागील काही काळापासून संघाच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव दिसून येत आहे. संचालकानी संघाच्या हिताची सूचना केल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे, संचालक मंडळाला विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेणे, अनावश्यक खर्च करणे, संचालकानी सभेमध्ये संचालकांना बोलण्याची संधी न देणे, आपल्या मर्जीतील काही निवडक संस्थांना कामाची शिफारस करणे, अशा अनेक प्रकारांमुळे सुरू असलेल्या एकाधिकारशाहीमुळे संचालक मंडळामध्ये नाराजी होती.
याशिवाय, संघाच्या सभासद म्हणून गरज नसताना खाण मजूर संस्थांची नोंदणी करणे, त्यामध्ये अनावश्यक खर्च लादणे, बेकायदेशीर पद्धतीने निमंत्रित संचालकांची नियुक्ती करणे, उपविधी मंजूर करून बेकायदेशीर चार संचालकांची नियुक्ती करणे, गरज नसताना नोकरभरती करणे, थकबाकीदार संस्थांना काम वाटप करुन संस्थेच्या हिताला बाधा आणणे अशा अनेक बाबी आमच्या निदर्शनास आल्या.
संघाच्या अस्तित्वाला आणि आर्थिक शिस्तीला धोका निर्माण करणारा हा कारभार आम्हाला मान्य नव्हता. संघामध्ये सुदृढ प्रशासन व प्रामाणिक कार्यपद्धती राबवली जावी यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले. मात्र, आमचे प्रयत्न वारंवार दुर्लक्षित झाले. परिणामी, संघातील प्रामाणिक कार्यपद्धतीच्या व पारदर्शक कारभाराच्या जपणुकीसाठी आम्ही १० संचालकांनी एकमताने सामूहिक राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
संघामध्ये न्याय्य व जबाबदार कारभार होणे, सर्व संचालकांना समान वागणूक मिळणे, तसेच सर्व सदस्य संस्थांचा सन्मान राखला जाणे अत्यावश्यक आहे. संघाच्या भविष्यासाठी आवश्यक असलेली ही भूमिका आम्ही घेतलेली असून, पुढील काळात शासन व संबंधित विभागांनी या प्रकारची चौकशी करून प्रशासकाची नियुक्ती करावी अशी आमची सर्वांची न्याय मागणी आहे तरी या मागणीचा विचार करून तातडीने कोल्हापूर जिल्हा मजूर संघावर प्रशासकाची नियुक्ती करावी ही विनंती.
—
राजीनामा दिलेले संचालक :
1) शाहू लक्ष्मण काटकर
2) जयहिंद विष्णू तोडकर
3) जयसिंग आनंदराव पाटील
4) तुकाराम धोंडीराम पाटील
5) उषा महादेव पाटील
6) कीर्ती राजेश मोरे
7) वसुंधरा वसंत पाटील
8) पद्मजा सुभाष कदम
9) युवराज रघुनाथ पाटील
10) तानाजी बाळू पोवार