*कागलमध्ये फ्री मेकअप व ब्युटी सेमिनारला महिलांचा जोरदार प्रतिसाद*
*माऊली महिला विकास संस्थेचे आयोजन*
*कागल, दि. ११:*
कागलमध्ये आयोजित केलेल्या फ्री मेकअप व ब्युटी सेमिनारला महिलांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. श्रमिक वसाहतीमधील नामदार हसनसाहेब मुश्रीफ सांस्कृतिक हॉलमध्ये माऊली महिला विकास संस्थेने या सेमिनारचे आयोजन केले होते. माऊली महिला विकास संस्था संस्था, ग्लिझ अँड ग्लॅमर व फातिमा फिझा (Glitz N Glamour व Fatima Fiza) यांच्या सहयोगातून आयोजित या कार्यक्रमाला माऊली महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. अमरिन नवीद मुश्रीफ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट फिजा हिरोली यांनी मेकअप सत्र, उत्पादन ज्ञान, दैनंदिन त्वचेची निगा राखण्याच्या टिप्स आणि रोजच्या लूकसाठी सोपा मेकअप रूटीन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
सौ.अमरिन मुश्रीफ म्हणाल्या, सौंदर्य व स्वच्छतेसंबंधी जागरूकता ही केवळ दिसण्यापुरती मर्यादित नसून ती आत्मविश्वास वाढवणारी गोष्ट आहे. अशा उपक्रमांमुळे महिलांना सौंदर्य, आरोग्य आणि स्वच्छतेबाबत आवश्यक ज्ञान मिळते, असे मत व्यक्त केले.
वैशाली नाईक म्हणाल्या, अशा प्रकारचा लाईव्ह मेकअप सेमिनार साधारणपणे मुंबई व पुणे येथे घेतला जातो. एका व्यक्तीसाठी दिवसाचे सात हजार रुपये शुल्क आकारले जाते. मुश्रीफ कुटुंबीयांनी ग्रामीण भागातील महिलांसाठी हा कार्यक्रम पूर्णपणे मोफत आयोजित केला, हा खरंच आमच्यासाठी गोल्डन चान्स आहे.
सेमिनारला सुलोचना पिष्टे, समिना मुल्लाणी, अश्विनी सणगर, अमिना शानेदिवाण, शुभांगी चौगुले, विद्या पोळ तसेच कागल व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
………….
*कागलमध्ये माऊली महिला विकास संस्थेच्यावतीने आयोजित फ्री मेकप व ब्युटी सेमिनारला उपस्थित सौ. अमरीन मुश्रीफ, मेकअप आर्टिस्ट फातिमा फिझा, वैशाली नाईक व उपस्थित महिला.*
===========