केडीसीसीच्या कर्मचाऱ्यांने सापडलेला पाच तोळ्यांचा दागिना केला परत* *सुरेंद्र पाटील यांच्या प्रामाणिकपणाबद्दल बँकेचे अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार*

Spread the news

*केडीसीसीच्या कर्मचाऱ्यांने सापडलेला पाच तोळ्यांचा दागिना केला परत*

 

 

  •  

*सुरेंद्र पाटील यांच्या प्रामाणिकपणाबद्दल बँकेचे अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार*

*मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, प्रामाणिकपणा हाच माणसाचा मौल्यवान दागिना*

*कोल्हापूर, दि. १०:*
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांने सापडलेला पाच तोळ्यांचा सोन्याचा दागिना प्रामाणिकपणे परत केला. श्री. सुरेंद्र किरण पाटील या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल बँकेचे अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व कौतुक केले. यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी कर्मचारी श्री. पाटील यांचे अभिनंदन व कौतुक केले. प्रामाणिकपणा हाच माणसाचा मौल्यवान दागिना आहे, असेही ते म्हणाले.

याबाबत अधिक माहिती अशी, बँकेच्या प्रधान कार्यालयात शेती कर्जे विभागात मौजे सांगाव ता. कागल येथील श्री. सुरेंद्र किरण पाटील हे क्लार्क पदावर कार्यरत आहेत. बँकेचे अध्यक्ष व दिवंगत आमदार कै. शामराव भिवाजी पाटील- बापूजी यांचे ते नातू होत. दोनच दिवसांपूर्वी बँकेच्या नव्या इमारतीमागील पार्किंगमध्ये मोटरसायकल बाहेर काढीत असताना त्यांना पाच तोळे सोन्याचे ब्रेसलेट सापडले. त्यांनी अनेकांना विचारले व सांगितलेही. परंतु; ते नेण्यासाठी कोणीच पुढे येईना. शेवटी त्यांनी आपल्या मोटरसायकलच्या शेजारीच मोटरसायकल लावलेल्या बँक कर्मचारी विकास पाटील रा. कसबा बावडा यांना फोन करून विचारणा केली. त्यांनी सुरुवातीला आपली कोणतीही वस्तू हरविले नसल्याचेही सांगितले. परंतु; थोड्यावेळाने त्यांच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट हरविल्याचे लक्षात येताच त्यांनी श्री. सुरेंद्र पाटील यांना फोन करून विचारले. त्यावर श्री सुरेंद्र पाटील यांनी त्यांना प्रधान कार्यालय परिसरात बोलावून ते सोन्याचे ब्रेसलेट परत दिले.

श्री. सुरेंद्र किरण पाटील यांच्या या प्रामाणिकपणाचे बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कौतुक होत आहे.
……….

*केडीसीसी बँकेचे कर्मचारी श्री. सुरेंद्र किरण पाटील यांनी सापडलेला पाच तोळे सोन्याचा दागिना प्रामाणिकपणे परत केला. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल बँकेचे अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे.*
============


Spread the news

You may also like

error: Content is protected !!