कोल्हापुरात माळी भवन उभारणीसाठी सर्वतोपरी मदत करू –अमल महाडिक

Spread the news

  1. कोल्हापुरात माळी भवन उभारणीसाठी सर्वतोपरी मदत करू
    –अमल महाडिक

कोल्हापूर : ‘ लिंगायत माळी समाज कोल्हापूरने उत्तम संघटन करुन विविध समाजोपयोगी उपक्रम प्रभावीपणे राबविले आहेत. गुणवंत
विद्यार्थ्यांचा सत्कार, गरजू विद्यार्थ्याना अर्थसहाय्य, सायकली वाटप आणि समाजातील कर्तबगारांना सन्मानित करत सामाजिक नाळ घट्ट बांधली
आहे. समाजातर्फे उभारण्यात येणाऱ्या माळी भवनसाठी सर्वेतोपरी मदत करू.’अशी ग्वाही कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे
आमदार अमल महाडिक यांनी दिली.

 

 

 

  •  

लिंगायत माळी समाज कोल्हापूरतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि समाजातील कर्तबगारांचा सन्मान असा संयुक्त कार्यक्रम आयोजित
केला होता. याप्रसंगी महाडिक बोलत होते. कोल्हापूर सीआयडी विभागाचे पोलिस अधीक्षक मनिषा दुबुले, कोल्हापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला यावेळी महात्मा फुले समाज रत्न पुरस्कार राजेंद्र बापूसाहेब माळी, सावित्रीबाई फुले आदर्श माता पुरस्कार इंदुताई माळी तर संत बसवेश्वर आदर्श कुटुंब पुरस्कार सांगाव येथील बाळासाहेब माळी यांच्या परिवाराला प्रदान करण्यात आला.

प्रभाकर कुलगुडे, संघटनेचे मार्गदर्शक
अण्णासाहेब माळी, लिंगायत माळी समाज संघटनेचे अध्यक्ष गुरुबाळ माळी, उपाध्यक्ष अनिल माळी, कार्याध्यक्ष संतोष माळी,महिला
आघाडीच्या अध्यक्षा वंदना माळी, उपाध्यक्षा वैशाली माळी, कार्याध्यक्ष विद्या माळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. काँग्रेसचे
शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवित शुभेच्छा दिल्या. येथील शाहू स्मारक भवन येथे कार्यक्रम झाला. समाजकार्यासाठी मदत
केल्याबद्दल सुरेश जांबोरे, धनश्याम माळी, अशोक राजाराम माळी, विजय माळी-रेंदाळ, गजानन माळी-यळगूड यांना कृतज्ञता सन्मान
म्हणून सत्कार केला. ‘रावसाहेब डी माळी शैक्षणिक फंड’साठी बाळासाहेब माळी यांनी २५ हजार रुपये तर इंदूमती माळी यांनी २१ हजार
रुपयेंची देणगी दिली. सत्काराला उत्तर देताना चांदी व्यावसायिक राजेंद्र माळी यांनी वीरशैव लिंगायत माळी समाज संघटनेला ७१ हजार
रुपयांची देणगी जाहीर केली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलिस अधिकारी मनिषा दुबुले यांनी,‘ शिक्षण घेत असताना ध्येय निश्चित करा. नवीन तंत्रज्ञान
आत्मसात करा. विविध क्षेत्रात करिअरसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत.’असे सांगितले.

संघटनेचे अध्यक्ष गुरुबाळ माळी यांनी प्रास्ताविक तर उपाध्यक्ष अनिल माळी यांनी स्वागत प्रास्ताविक केले. समाजातर्फे
माळी भवन बांधण्याचे प्रस्तावित आहे. या भवनसाठी समाजातील प्रत्येकाने योगदान द्यावे. तसेच शैक्षणिक फंडसाठी मदत करावी.’असे
आवाहन माळी यांनी केले. शिक्षक संतोष माळी यांनी सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी प्रभाकर कुलगुडे, संघटनेचे मार्गदर्शक
अण्णासाहेब माळी, लिंगायत माळी समाज संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष माळी,महिला
आघाडीच्या अध्यक्षा वंदना माळी, उपाध्यक्षा वैशाली माळी, कार्याध्यक्ष विद्या माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे संयोजन खजानिस किशोर माळी, संचालक बाळासाहेब माळी, तानाजी माळी, राजाराम माळी, अशोक माळी, काशीनाथ माळी, महिला संघटनेच्या सचिव श्रुती कुलगुडे, खजानिस भारती माळी यांनी केले. वंदना माळी यांनी आभार मानले


Spread the news

You may also like

error: Content is protected !!