Spread the news

 

 

  •  

 

 

कोल्हापुरात पंधरा वर्षे महिला आयुक्त

पण महिलांना त्याचा उपयोग काय?

भारती पवार यांचा सवाल

कोल्हापूर : गेल्या दहा ते पंधरा वर्षाच्या कालावधीत कोल्हापूर महापालिकेत महिला आयुक्त आहेत, महापौरही महिला झाल्या पण त्याचा उपयोग? साधं महिलांसाठी स्वच्छतागृह बांधता येत नाही, स्वयंचलित स्वच्छतागृहांचा प्रस्ताव दुर्लक्षित आहे असा आरोप माजी नगरसेविका आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव सौ भारती पवार यांनी पत्रकार बैठकीत केला.

पवार म्हणाल्या, महापालिकेत सत्ता काँग्रेसची असो वा अन्य कोणाची.. महिलांना आरोग्य सुविधा मिळायला पाहिजे. गेल्या दहा वर्षात महापौरपदी ही अनेक महिला विराजमान झाल्या, मात्र स्वच्छतागृहांची सोय होऊ शकली नाही ही लाजिरवाणी बाब असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये प्रशासनाची मोठी जबाबदारी असते. स्वच्छतागृहांच्या सुविधेसंदर्भात महापालिकेकडे इको फ्रेंडली स्वच्छतागृहांचा प्रस्ताव सादर केला. मात्र महापालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले.
कोल्हापूरचे उद्योजक सुनील बोडके यांनी स्वयंचलित इको फ्रेंडली स्वच्छतागृहांची संकल्पना तयार केली आहे. त्यांनी यासंदर्भात महापालिकेकडे प्रस्ताव दिला परवानगी द्या, देखभालीचा खर्च मी सांभाळतो अशी त्यांनी तयारी दर्शविली. तरीही प्रशासनाने तो प्रस्ताव नाकारला. महापालिका अधिकाऱ्यांनी स्वच्छतागृहासंबंधी संवेदनशीलता दाखवून येत्या नवरात्रोत्सवापर्यंत सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आमदार सतेज पाटील यांनी आपलं राजकीय वर्चस्व पणाला लावत थेट पाईपलाईन योजना मंजूर करून आणली आता त्याचं पाणी व्यवस्थित देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे सतेज पाटील यांच्यावर टीका निरर्थक आहे असा आरोप करून त्या म्हणाल्या 108 कोटी निधी खर्चून रस्ते तयार करत असल्याचे सांगितले असते प्रत्यक्षात रस्ते दिसतच नाहीत केवळ जाहिरात दिसते आतापर्यंत नगरसेवकांच्या नावाने कडे फोडले जात होते आता मात्र नगरसेवक नाहीत सर्व जबाबदारी ही प्रशासनाची आहे त्यामुळे तातडीने प्रशासनाने कोल्हापूरला सुविधा देण्यासंदर्भात कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली.
पत्रकार परिषदेला संजय पवार वाईकर, संपतराव चव्हाण पाटील, किशोर खानविलकर, संध्या घोटणे, वनिता देठे, उज्वला चौगुले, अलका सनगर, मंगल खुडे, वैशाली महाडिक, पूजा आरडे, वैशाली जाधव आदी उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!