कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धांना सुरुवात
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धांना आज सुरुवात झाली. असोसिएशनचे अध्यक्ष आणि घाटगे ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर सतीश घाटगे यांच्या हस्ते स्पर्धांचं उद्घाटन झालं. या स्पर्धेसाठी महादेवरावजी रामचंद्र महाडिक यांनी प्रायोजकत्व दिलं आहे. स्पर्धा अंबाई डिफेन्स येथील बॅडमिंटन कोर्टवर आजपासून 13 तारखेपर्यंत होणार आहेत. या स्पर्धेत एकूण 326 खेळाडूंनी भाग घेतला आहे.
उद्घाटनप्रसंगी व्हाईस चेअरमन विनोद भोसले, ट्रेझरर चंद्रशेखर सोवनी, सेक्रेटरी तन्मय करमरकर यांच्यासह सुमित चौगुले, साईदास, जगदीश काणे, अरुणा रसाळ, योगिनी कुलकर्णी, सिद्धार्थ नागावकर आणि अक्षय मनवाडकर हे पदाधिकारी उपस्थित होते.