“कोल्हापूर फर्स्ट” संस्थेच्या कार्यालयाचा भव्य शुभारंभ संपन्न कोल्हापूरच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी स्थापन झालेल्या “कोल्हापूर फर्स्ट” या संस्थेच्या कार्यालयाचा शुभारंभ आज रोजी उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. ना. श्री. चंद्रकांत पाटील (उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य) तर अध्यक्षस्थानी मा. ना. श्री. प्रकाश आबीटकर (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य) हे होते.
१८ मान्यवर संस्थांच्या सहभागातून “कोल्हापूर फर्स्ट” ही संस्था स्थापन झाली असून, तिचा लाँच सोहळा यापूर्वी ९ मार्च २०२५ रोजी पार पडला होता. आता या संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी “कोल्हापूर फर्स्ट” चे समन्वयक श्री. सुरेंद्र जैन यांनी प्रास्ताविक करताना कोल्हापूरच्या शाश्वत विकासासाठी आखण्यात आलेल्या अजेंडामधील प्रमुख ६ विषयांवर भर दिला. सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘२०४७ पर्यंत विकसित भारत’ या संकल्पनेशी सुसंगत असा ‘विकसित कोल्हापूर’ घडवण्यासाठी हायकोर्ट सर्किट बँक, IT पार्कचा विकास, कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे लाईन , कोल्हापूर-सांगली-सातारा पर्यटन सर्किट, कोल्हापूर सांगली सातारा फाउंड्री अँड इंजीनियरिंग हब, नवीन आयुक्तालय या मुद्द्यांवर प्राधान्याने कार्यवाही व्हावी, अशी विनंती त्यांनी उपस्थित मंत्र्यांकडे केली. तसेच येत्या काळात “कोल्हापूर फर्स्ट” चे कार्यालय स्वतःच्या वास्तूत सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. *महालक्ष्मी विकास आराखडा मंजूर करून १३५० कोटी रुपयांचा निधी व ज्योतिबा विकास करिता २५० कोटी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त केले. तसेच या ऐतिहासिक यशाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर फर्स्ट व सर्व संस्था तसेच नागरिकांच्या वतीने कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्र्यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात येईल, असे सांगण्यात आले.*
मा. चंद्रकांत पाटील म्हणाले, “कोल्हापूरच्या विकासासाठी संस्थेचा हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे. योग्य अभ्यास आणि आराखड्याद्वारे गतिमान विकास साधता येऊ शकतो.” ते पुढे म्हणाले की, “२०१६ च्या अर्थसंकल्पात कोल्हापूरसाठी सर्किट बेंचची तरतूद झाली होती, याची आठवण आज मी करून देतो. उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे यासाठी शासनस्तरावर जिथे जिथे मदत लागेल, तिथे कोल्हापूरचा सुपुत्र म्हणून मी सर्वतोपरी प्रयत्न करीन,” असे आश्वासनही त्यांनी दिले.
मा. प्रकाश आबीटकर म्हणाले, ‘”कोल्हापूर फर्स्ट” संस्थेच्या मागण्या व सूचना अत्यंत महत्त्वाच्या असून, शासन सकारात्मक पावले उचलेल आणि शक्य ती सर्व मदत केली जाईल. तसेच असे एकत्र संस्थेचे मांडणी आधीचा काळात झाली असती, तर कोल्हापूरचा विकास आजपर्यंत अधिक गतिमान आणि प्रभावी झाला असता,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
उपस्थित मान्यवर: “कोल्हापूर फर्स्ट” चे समन्वयक श्री. सुरेंद्र जैन,सह-समन्वयक सर्जेराव खोत, मॅकचे मोहन कुशीरे, हरिश्चंद्र धोत्रे, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे कमलाकांत कुलकर्णी, श्रीकांत दुधाने, बाबा कोंडेकर, दिनेश बुधले, स्मक चे अतुल पाटील, बदाम पाटील, गोशिमा स्वरूप कदम जिल्हा बार असोसिएशनचे व्ही. आर.पाटील, निशिकांत पाटोळे, सागर घोरपडे राजू ओतारी, आयटी असोसिएशनचे विश्वजीत देसाई, शांताराम सुर्वे,चेंबरचे प्रदीपभाई कापडिया, हॉटेल असोसिएशनचे उज्ज्वल नागेशकर, सचिन सानबग, मेडिकल असोसिएशनचे डॉ. अमोल कोडोलीकर, डॉ. आर. एम. कुलकर्णी, इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअर्सचे अजय देशपांडे, कंपनी सेक्रेटरी असोसिएशनचे जयदीप पाटील, पद्मसिंह पाटील, सचिन बिडकर, क्रीडा प्रतिष्ठानचे बाळ पाटणकर, अमर सासने, ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशनचे बळीराम वराडे,संजय गांधी, सचिन सावंत, कोल्हपूर फर्स्ट चे पीआरओ विकास जगताप आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. क्षितिजा ताशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन अॅड. सर्जेराव खोत यांनी केले. या वेळी सर्व सहभागी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य आणि कोल्हापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.