कोल्हापूर फर्स्टकडून जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार*

Spread the news

 

­

 

📰 *कोल्हापूर फर्स्टकडून जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार*­
—————————————–
कोल्हापूर, दि. ३० मार्च : कोल्हापूर फर्स्टच्या वतीने जिल्हाधिकारी श्री. अमोल येडगे यांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल तसेच ई-गव्हर्नन्समधील उत्कृष्ट कामगिरी आणि राज्यस्तरीय सन्मान प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

  •  

राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स क्षेत्रात कोल्हापूर जिल्ह्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे श्री. अमोल येडगे यांना माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. जिल्ह्याच्या प्रशासकीय नेतृत्वाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडताना त्यांनी राबवलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर फर्स्टकडून जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये हा सत्कार करण्यात आला.
यावेळी कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेन्द्र जैन यांच्या हस्ते श्री. अमोल येडगे यांना शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना सुरेन्द्र जैन यांनी जिल्हाधिकारी यांच्या कार्याचे कौतुक करत गेल्या वर्षभरामध्ये हायकोर्ट सर्किट बँकेची स्थापना, आयटी पार्क जमीन हस्तांतरण, कोल्हापूर वैभववाडी रेल्वे लाईन चा डीपीआर केंद्र व राज्य शासनाची मंजुरी, महालक्ष्मी अंबाबाई विकास आराखडा हे सर्व गोष्ट कोल्हापूरचा विकासाला एक ऐतिहासिक झेप देणारे व नेक्स्ट जनरेशनला अपेक्षित कोल्हापूरची वाटचाल होत आहे अशी भावना व्यक्त केली. या सर्व विकासाचे ऐतिहासिक निर्णय होत असताना राजकीय नेतृत्व बरोबर प्रशासकीय कुशलतेचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री. अमोल येडगे व त्यांचे सर्व सहकारी यांचे कार्य होय. काही दिवसांपूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेला सन्मान हा त्यांच्या कार्याची पावती असून तो संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.

या वेळी आमदार अशोकराव माने, कोल्हापूर फर्स्टचे उपाध्यक्ष प्रताप पाटील, सहसचिव जयदीप पाटील, खजिनदार पद्मसिंह पाटील, केईए चे अध्यक्ष कमलाकर कुलकर्णी, स्मॅकचे अध्यक्ष जयदीप चौगले, मॅकचे संचालक हरिश्चंद्र धोत्रे, संजय पेंडसे, हॉटेल मालक संघाचे सचिन शानबाग, ट्रॅव्हल असोसिएशनचे बळीराम वऱ्हाडे, आयटी असोसिएशनचे राहुल मेंच, शांताराम सुर्वे, कोल्हापूर फर्स्ट विशेष निमंत्रित मिलिंद आळवेकर, संजय जोशी, सतीश डकरे आदी उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!