कोल्हापूर हॉटेल मालक संघ कोल्हापूर या संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन रामकृष्ण शानभाग
कोल्हापूर
कोल्हापूर हॉटेल मालक संघ कोल्हापूर या संघटनेच्या सभेमध्ये सन २०२५ – २०२६ करता नवीन पदाधिकारी निवड करणेत आली. अध्यक्षपदी सचिन रामकृष्ण शानभाग यांचे नाव श्री आनंद शंकरराव माने आणि उपाध्यक्षपदी श्री अरुण यशवंतराव भोसले चोपदार यांचे नाव श्री जयवंत पांडूरंग पुरेकर यांनी सुचवले. त्यांची सर्वानुमते निवड झाली.
फोटोमध्ये नवीन पदाधिकारी डावीकडून खजिनदार श्री सुशांत शरद पै, सह सचिव श्री संदीप दत्तात्रेय सूर्यवंशी, नूतन अध्यक्ष श्री. सचिन रामकृष्ण शानभाग, माजी अध्यक्ष श्री उज्वल शंकरराव नागेश्कर, उपाध्यक्ष श्री. अरुण यशवंतराव भोसले चोपदार, सचिव श्री सिद्धार्थ मनमोहन लाटकर, ऑडिटर शंकरराव गोविंदराव यमगेकर
सभेला श्री. आनंद माने, श्री. जयवंत पुरेकर, श्री. शिवराज जगदाळे, श्री. उदय भोसले, श्री. गौरव कामत, श्री. मौतिक पाटील, श्री. धर्मेंद्र देशपांडे, श्री. दयानंद शेट्टी, श्री. शंतनू पै, श्री. दीपक कुरबेट्टी, श्री. उमेश राऊत, श्री. आशिष रायबागे, श्री. मोहन पाटील, श्री. सचिन कळंत्रे, श्री. नितीन आळवेकर, श्री. राकेश मगदूम, श्री. अनिकेत कुलकर्णी, इ. संघाचे सभासद हजर होते.