कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयश्री खेचून आणू. जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा.

Spread the news

 

­

 

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयश्री खेचून आणू. जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील
शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा.

  •  

आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर शहरातील मिरजकर तिकटी येथील अंध मूलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अन्नदान करुन मानवतेचा संदेश देत वाढदिवस साजरा केला. यावेळेस विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी प्रार्थना म्हणून शरदचंद्र पवार यांना दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमानंतर पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील व शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून तसेच पवार साहेबांना दीर्घायुष्य लाभो अशा सदिच्छा व्यक्त करीत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला. जिल्हाध्यक्षांनी संदेश दिला की या वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावर कोल्हापूर महानगर पालिकेच्या निवडणुकीत विजयश्री खेचून आणण्याच्या कामात सर्वांनी झोकून देऊन कामास लागावे.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सरचिटणीस सुनील देसाई यांनी केले व आभार प्रदर्शन निरंजन कदम यांनी केले यावेळी बाजीराव खाडे, पद्मजा तिवले, अनिल घाटगे, मकरंद जोंधळे, गणेश जाधव, गणेश नलावडे, सुरेश कुरणे, महादेव पाटील, रियाज कागदी सोहेल, फिरोज सरगुर बागवान लहू शिंदे फिरोज उस्ताद अरुणा पाटील छाया नलवडे नागेश शिंदे इ.कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!