कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील महसुली आणि भांडवली जमा-खर्चाचा सन 2025-26 चा सुधारित व सन 2026-27 चा नवीन अंदाजपत्रकीय आराखडा मंजूर होणेबाबत.

Spread the news

कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील महसुली आणि भांडवली जमाखर्चाचा सन 2025-26 चा सुधारित  सन 2026-27 चा नवीन अंदाजपत्रकीय आराखडा मंजूर होणेबाबत.

­

 

                  संदर्भ:-  महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 97 अन्वये.

  •  

मा.महोदय,

            कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील महसुली आणि भांडवली, तसेच अनुषंगिक इतर फंडांचे जमा-खर्चाचा सन 2025-26 चा सुधारित अंदाज व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 97 अन्वये सन 2026-27 चा नवीन अंदाजपत्रकीय आराखडा मान्यतेसाठी यासोबत सादर केला आहे.  त्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 98 अन्वये अंदाजपत्रक ‘ब’ म्हणून मा.परिवहन समिती व मा.स्थायी समितीचे शिफारसीसह मा.सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी सादर करणेत येत आहे.

            कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे अनुसूचीचे प्रकरण 4, वर्ग 3(ब) नुसार ‘अत्यावश्यक सेवा’ म्हणून संबोधण्यात आले आहे.  कोल्हापूर महानगरपालिकेचा हा परिवहन उपक्रमसुध्दा सक्षमपणे कार्यरत रहाण्यासाठी सातत्त्याने प्रयत्न करणेत येत आहेत.  कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रम ही शहरी प्रवासी वाहतूक करणारी व महानगरपालिकेमार्फत 01 एप्रिल 1962 पासून कार्यान्वित असलेली म्हणजे सुमारे 64 वर्षांपासून सातत्याने सेवा देणारी संस्था आहे.  शहरी प्रवासी वाहतूक उपक्रम हा वाढता खर्च व मर्यादित उत्पन्नाची साधने असलेने महानगरपालिकेच्या अर्थसहाय्याने नागरिकांना सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची सेवा उपलब्ध करुन देत आहे.  बसेस सुव्यवस्थित ठेवणेसाठी लागणारा अत्यावश्यक खर्च हा के.एम.टी. उपक्रमास प्राप्त होणाऱ्या उत्पन्नातूनच करावा लागत आहे.  अशा परिस्थितीत प्रवासी नागरिकांना सुरक्षित व किफायतशीर भाड्यामध्ये “प्रवासी वाहतुकीची सेवा” उपलब्ध करुन देण्यासाठी के.एम.टी.कडून सातत्त्याने प्रयत्न केले जात आहेत.

            नवीन आर्थिक वर्षामध्ये के.एम.टी. उपक्रमाच्या बस ताफ्यामध्ये प्रदुषण विरहीत वातानुकुलीत इलेक्ट्रिक बसेस दाखल होत असलेने “ग्रीन के.एम.टी.” केंद्रीत उपक्रम राबविणेचे उद्दीष्ट आहे.  या अंतर्गत इंधन खर्चात बचत, प्रदुषण कमी करणे, सौर ऊर्जेचा वापर करणे, प्रवासी नागरिकांना आरामदायी व सुखकर प्रवासासाठी के.एम.टी.ची ब्रॅण्ड इमेज ऊंचावणे, इ. प्रमुख बाबींचा समावेश आहे.   ई-बस सेवा सुरु झालेनंतर प्रायोगिक तत्वावर प्रातिनिधीक दोन मार्ग डेडीकेटेड ई-बस कॅरिडॉर म्हणून निर्माण करणे तसेच प्रवासी संख्या अधिक असलेल्या मार्गावर किमान फ्रिक्वेन्सी 10 ते 12 मिनिटे राहील असे वाहतुकीचे नियोजन करणेत येणार आहे.

            इलेक्ट्रिक बसेससाठी किमान विजेचा वापर व्हावा व विजेची निर्मिती के.एम.टी. उपक्रमाद्वारे करता यावी, यासाठी यंत्रशाळेमध्ये उभ्या करणेत येणाऱ्या नवीन इमारतीवर सौर रुफ टॉप पॅनेल बसवून सौर ऊर्जा प्रकल्प राबविणेसाठी भांडवली निधीमध्ये तरतूद करणेत आली आहे.  यासाठी मेडा अथवा डीपीडीसी मधून निधी उपलब्ध होणेसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.  तसेच, झीरो ईमिशन मार्ग तयार करणेसाठी ब्रॅण्डींगद्वारे व सीएसआर निधीमधून महसुलामध्ये वाढ करणेसाठी विविध कंपन्यांना सीएसआर मधून निधी उपलब्ध करुन देणेसाठी प्रयत्न करणेत येणार आहे.

            नवीन इलेक्ट्रिक बसेससाठी Integrated Transport Management System (ITMS) अत्यावश्यक असल्याने यासाठी केंद्र अथवा राज्य शासनाकडून निधी मिळणे आवश्यक आहे.  त्याद्वारे प्रवाशांना डिजीटल सेवा देऊन ITMS द्वारे स्मार्ट सेवा उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे.  यामध्ये के.एम.टी. मोबाईल तिकीटींग ॲप, लाईव्ह बस ट्रॅकींग सिस्टीम, ऑनलाईन पास नुतनीकरण, QR तिकीटींग, सीसीटीव्ही, महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बसेसमध्ये पॅनिक बटन सुविधा, महिला हेल्पलाईन, इ. यंत्रणांसह कॅशलेस ट्रॅव्हलींग सुविधा पुरविता येणार आहे.

            शहरामधील किमान 15 मुख्य बस थांबे सुशोभित करुन डिजीटल डिस्प्ले बोर्डद्वारे आकर्षक करता येणार आहेत.  त्यासाठी सीएसआर निधी अथवा खाजगी ठेकेदारामार्फत सदरची योजना राबविणेत येईल.

सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये प्रचलित 65 डिझेल इंधनावरील बसेस मार्गस्थ राहतील.  त्याचप्रमाणे PM e-Bus Sewa योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यातील 40 इलेक्ट्रिक बसेस पुढील आर्थिक वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने दाखल होतील, असे नियोजन करणेत आले आहे.

इलेक्ट्रिक बसेस टप्प्याटप्प्याने दाखल होणार असलेने पुढील आर्थिक वर्षात सरासरी 88 बसेस मार्गस्थ राहतील, असे अपेक्षित करुन जमा व खर्चाचे नवीन अंदाज सादर केले आहेत.

            आजमितीस परिवहन उपक्रमाकडे सुमारे मंजूर 881 पदांपैकी 324 कायम कर्मचारी व बदली व कंत्राटी सुमारे 196 असे एकूण 520 कर्मचारी कार्यरत आहेत.  महानगरपालिकेच्या अनुदानातून फक्त कर्मचाऱ्‍यांच्या वेतनावर खर्च केला जात आहे.  बसेस सुव्यवस्थित ठेवणेसाठी लागणारा वरील खर्च, सेवानिवृत्तांची देणी व वेतना व्यतिरिक्त अन्य खर्च हा के.एम.टी. उपक्रमास प्राप्त होणाऱ्या उत्पन्नातूनच करावा लागत आहे.  तसेच, महानगरपालिकेकडून प्राप्त होणारे अनुदानाव्यतिरिक्त वेतनासाठी कमी पडणारी रक्कम परिवहन उपक्रमाकडून खर्च करावी लागत आहे.    परिवहन उपक्रमास आर्थिक तूट निर्माण झाली असली तरीसुध्दा प्रवासी नागरिकांना सुरक्षित व किफायतशीर भाड्यामध्ये बस सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी के.एम.टी.कडून सातत्त्याने प्रयत्न केले जात आहेत.

            केंद्र शासनाच्या Ministry of Housing & Urban Affairs मंत्रालयाकडून PM e-Bus Sewa योजनेंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेस 100 इलेक्ट्रिक बसेस व डेपो डेव्हलपमेंट व BTM Power Meter Infrastructure या पायाभूत सुविधांसाठी निधी मंजूर झालेली असून, पायाभूत सुविधांमधील एचटी लाईनचे कामकांज पुर्णत्वास आले आहे.  तसेच, एलटी लाईन व सिव्हील डेपो डेव्लपमेंटचे कामकांज अंतिम टप्प्यात असून, केंद्र व राज्य शासनाकडून मंजूर निधीपैकी रक्कम प्राप्त झालेनंतर पुढील तीन महिन्यांचे कालावधीत सदरचे काम पुर्णत्वास येणे अपेक्षीत आहे.  त्यामुळे पुढील आर्थिक वर्षातील सात महिन्यांचे कालावधीत पहिल्या टप्प्यातील 40 इलेक्ट्रिक बसेस ताफ्यात दाखल होऊन नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत होतील, असे अपेक्षीत आहे.

            कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील महसुली आणि भांडवली, तसेच अनुषंगिक इतर फंडांचे जमा-खर्चाचा सन 2025-26 चा सुधारित अंदाज व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 97 अन्वये सन 2026-27 चा नवीन अंदाजपत्रकीय आराखडा तयार करणेत आला आहे.  त्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 98 अन्वये अंदाजपत्रक ‘ब’ म्हणून मा.परिवहन समिती व मा.स्थायी समितीचे शिफारसीसह मा.सर्वसाधारण सभेची मान्यता होणे आवश्यक असते.

सन 2025-26 चे सुधारित अंदाजपत्रकामध्ये चालू आर्थिक वर्षामध्ये ज्या प्रमाणात बसेस मार्गस्थ राहिलेल्या आहेत, त्यानुसार म्हणजे 56 बसेसच्या दैनंदिन सरासरी वापरानुसार वाहतुकीपासून प्राप्त झालेले उत्पन्न व इतर बाबींपासून आलेले उत्पन्न महसुली जमेमध्ये आहे.  ज्या प्रमाणात बसेस धांवलेल्या आहेत, त्याच प्रमाणात दैनंदिन खर्चामध्ये सुध्दा विशेषत: इंधन खर्च, बसेसची देखभाल-दुरुस्ती व बसेसचा विमा इ. खर्च कमी झालेला आहे.  सन 2025-26 चे सुधारित अंदाजपत्रकामध्ये महसुली व भांडवली जमा व खर्चाबाबत ठळक मुद्दे खालीलप्रमाणे :

(अ)      सुधारित महसुली जमा अंदाज :

                           (1)            वाहतुकीपासून जमा                                  ..          रु.22,64,31,000/-

                           (2)            इतर बाबींपासून उत्पन्न                             ..          रु.  8,03,67,000/-

(इतर बाबींपासून उत्पन्नामध्ये बसवरील जाहिरात भाडे, एक वर्षाचे थकीत पोलीस अनुदान, पे ॲण्ड पार्किंगपासून जमा, मनपा डिझेल परतावा, इ. बाबींचा समावेश आहे.)

                           (3)            महानगरपालिका अर्थसहाय्य                      ..          रु.21,00,00,000/-

सुधारित महसुली खर्च अंदाज :

                           (1)            वेतनावरील खर्च                                      ..          रु.31,33,00,000/-

                           (2)            इंधन व बसेस देखभाल दुरुस्ती                    ..          रु.18,44,60,000/-

                           (3)            मनपा परतफेड, भांडवलीकडे वर्ग रक्कम ..   रु.     39,20,000/-

वरीलप्रमाणे ठळक मुद्द्यांसहीत अव्वल शिल्लकेसह एकूण सुधारित महसुली जमा रु.51,98,00,000/- व महसुली खर्च रु.51,74,17,000/- असा सादर करुन रु.23,83,000/- इतकी अखेर शिल्लक सुधारित करुन दुरुस्त अंदाज आहे.

(ब)       सुधारित भांडवली जमा अंदाज :

(1) निरनिराळ्या बाबींवरील घसारा ..  रु. 55,00,000/-
(2) PM e-Bus Sewa प्रकल्पांतर्गत BTM Power Meter Infrastructure साठी केंद्र शासन अनुदान जमा ..  रु. 2,65,00,000/-
(3) PM e-Bus Sewa प्रकल्पांतर्गत Depot Development Infrastructure साठी केंद्र व राज्य शासन अनुदान जमा ..  रु. 6,00,00,000/-

सुधारित भांडवली खर्च अंदाज :

(1) PM e-Bus Sewa प्रकल्पांतर्गत LT Line साठी खर्च (केंद्र शासन अनुदानातून) ..  रु. 2,65,00,000/-
(2) PM e-Bus Sewa प्रकल्पांतर्गत Depot Development Infrastructure साठी खर्च (केंद्र व राज्य शासन अनुदानातून) ..  रु. 6,00,00,000/-

वरीलप्रमाणे ठळक मुद्द्यांसहीत अव्वल शिल्लकेसह एकूण सुधारित भांडवली जमा रु.9,28,61,000/- व भांडवली खर्च रु.8,96,20,000/- असा सादर करुन रु.32,41,000/- इतकी अखेर शिल्लक सुधारित करुन दुरुस्त अंदाज आहे.

सन 2026-27 चे नवीन अंदाजपत्रकामध्ये एकूण 72 बसेस वापरासाठी ताफ्यामध्ये तयार ठेवणे व त्यापैकी दैनंदिन सध्याच्या के.एम.टी. ताफ्यातील स्वमालकीच्या सुमारे 65 डिझेल इंधनावरील बसेस व पुढील आर्थिक वर्षामध्ये PM e-Bus Sewa योजनतेंतर्गत टप्प्याटप्प्याने दाखल होणाऱ्या 40 ईलेक्ट्रिक बसेस याप्रमाणे एकूण 88 बसेस सरासरी मार्गस्थ राहतील, असे अपेक्षित करुन जमा व खर्चाचे नवीन अंदाज सादर केले आहेत.  सन 2026-27 चे नवीन अंदाजपत्रकामध्ये महसुली व भांडवली जमा व खर्चाबाबतचे ठळक मुद्दे खालीलप्रमाणे :

(अ)       नवीन महसुली जमा अंदाज :

   (1)      वाहतुकीपासून जमा .. रु. 35,06,95,000/-
   (2)      वाहतुकीपासून पोषण सरचार्ज जमा .. रु. 27,00,000/-
   (3)      इतर बाबींपासून जमा (यामध्ये बसवरील जाहिरात भाडे, थकीत पोलीस अनुदान, पे ॲण्ड पार्किंगपासून जमा, सवलत परतावा अनुदान, इ. बाबींचा समावेश आहे.) .. रु. 12,10,00,000/-
   (4)      महानगरपालिका अर्थसहाय्य .. रु. 23,25,00,000/-
   (5)      PM e-Bus Sewa प्रकल्पांतर्गत प्रति कि.मी.साठी अनुदान जमा .. रु. 3,33,00,000/-

नवीन महसुली खर्च अंदाज :

   (1)      वेतनावरील खर्च .. रु. 37,15,75,000/-
   (2)      जन.ॲड., वर्कशॉप व ट्रॅफिक इतर खर्च .. रु. 3,33,95,000/-
   (3)      इंधन व बसेस देखभाल दुरुस्ती .. रु. 19,87,90,000/-
   (4)      मनपा परतफेड, घसारा व भांडवलीकडे वर्ग रक्कम .. रु. 1,52,00,000/-
   (5)      सरकारी कर व इतर चार्जेस .. रु. 1,96,00,000/-
   (6)      PM e-Bus Sewa प्रकल्पांतर्गत खर्च .. रु. 9,60,00,000/-

वरीलप्रमाणे ठळक मुद्द्यांमध्ये वेतनावरील खर्च हा फक्त कार्यरत कर्मचाऱ्यांचा घेणेत आलेला असून, यामध्ये रिक्त पदांवर नियुक्ती दिलेस वेतनावरील खर्चामध्ये वाढ होऊन, तो सुधारित करावा लागणार आहे.

वरील महसुली जमेमध्ये 48 टक्के जमा ही वाहतुकीपासून प्राप्त असून, इतर बाबींपासूनची जमा 16 टक्के, मनपा अर्थसहाय्य 32 टक्के, केंद्र शासनाचे PM e-Bus Sewa प्रकल्पांतर्गत अनुदान जमा 4 टक्के आहे.  तर, महसुली खर्चामध्ये नोकरांवरील खर्च 50 टक्के असून


Spread the news

You may also like

error: Content is protected !!