Spread the news

*कोल्हापुरात आज राष्ट्रवादीच्या नूतन जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार*

­

 

*वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार कार्यक्रम*

  •  

*सायंकाळी चार वाजता धैर्यप्रसाद हॉल येथे होणार कार्यक्रम*

कोल्हापूर, दि. १२:
कोल्हापूर जिल्हा परिषदेत व जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांमध्ये निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व निवडणूकपूर्व आघाडी केलेल्या मित्रपक्षांच्या सदस्यांचा सत्कार पक्षाच्यावतीने आज शुक्रवारी दि. १३ होणार आहे. कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्किट हाऊस रस्त्यावरील सिंचन भवनजवळच्या धैर्यप्रसाद सांस्कृतिक हॉल येथे सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर यांनी ही माहिती दिली.

यावेळी माजी आमदार राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, डॉ. नंदाताई बाभुळकर, मानसिंगराव गायकवाड, अरुणराव डोंगळे, राहुल पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, शहराध्यक्ष आदिल फरास, इचलकरंजी शहराध्यक्ष सुहास जांभळे आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

नुकत्याच झालेल्या कोल्हापूर जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वात मोठा म्हणजेच एक नंबरचा पक्ष ठरलेला आहे. जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता स्थापन होऊन राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार आहे. तसेच; विविध पंचायत समित्यांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता मिळविली आहे.
=========


Spread the news

You may also like

error: Content is protected !!