Spread the news

कोल्हापूर अर्बनला १७ कोटींचा नफा

­

 

कोल्हापूर : कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला मागील आर्थिक वर्षात १७.१८ कोटी ढोबळ नफा झाला असून निव्वळ एनपीएचे प्रमाण शून्य टक्के असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष शिरीष कणेरकर यांनी दिली. बँकेचा मार्चअखेर १३८३.१६ कोटी इतका व्यवसाय झाला असून ठेवी ९२०.९४ कोटी तर कर्जे ४६२.२२ कोटी इतकी आहेत.

  •  

बँकेचा स्वनिधी दोनशे कोटी तर नेटवर्थ ७८.६८ कोटी इतके आहे. निव्वळ नफा ४.६८ कोटी व भागभांडवल २१.३३ कोटी इतके आहे. बँकेचा भांडवल पर्याय प्रमाण २५.१० टक्के इतके आहे.

ग्राहकांना सर्व प्रकारच्या अत्याधुनिक बँकिंग सुविधा देण्याबरोबरच बँकेने कमीत कमी व्याजदरामध्ये कर्जे उपलब्ध करून दिली आहेत. नवीन आर्थिक वर्षात कर्ज वाढीच्या दृष्टीने व कमीत कमी थकबाकी राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असून प्रत्येक कर्जदाराचा लोन प्रोटेक्टर स्कीम अंतर्गत विमा कवच करण्याचा मानस आहे. अध्यक्ष शिरीष कणेरकर, उपाध्यक्ष जयसिंगराव माने, संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार बोरगांवकर यांनी बँकेचे अधिकारी, सभासद, कर्जदार, खातेदार यांचे हितचिंतक या सर्वांचे सहकार्य मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!