कोल्हापूरचा बॅडमिंटन संघ संभाजीनगरातील आंतरजिल्हा स्पर्धेसाठी रवाना..
कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन तर्फे जुलै २०२५ मध्ये आयोजित जिल्हा बॅडमिंटन स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. या स्पर्धेतून निवडलेला कोल्हापूरचा वरिष्ठ संघ १५ व १६ ऑगस्ट २०२५ रोजी संभाजीनगर येथे होणाऱ्या आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सतीश घाटगे यांनी खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले. संघाला शुभेच्छा देतांना “जिंकणे हरणे हा खेळाचा भाग आहे. पण शिस्त, एकाग्रता आणि निष्ठेने केलेला प्रयत्न खेळाडूच्या व्यक्तिमत्त्वावर कायमस्वरूपी ठसा उमटवतो,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. त्यांनी खेळाडूंना खेळाचे दूत म्हणून शिस्त आणि संतुलित वर्तन जपण्याचे आवाहन केले.
कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे कार्यकारी मंडळ आणि कोल्हापूरच्या बॅडमिंटन परिवाराने संघाला शुभेच्छा दिल्या आणि कोल्हापूरच्या समृद्ध बॅडमिंटन परंपरेला उजाळा देत दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली आहे.