कोल्हापुरात ‘स्वयंप्रभा’ शॉपिंग व फूड फेस्टिव्हल – दिवाळीची रंगत, चवीचे स्वाद आणि आकर्षक बाजारपेठ एकाच ठिकाणी!
कोल्हापूर, १० ऑक्टोबर
कोल्हापुरात दिवाळीचा रंगीत सणाचा गोडवा आणि चटकदार खाद्य पदार्थांचे आकर्षण आता एका छताखाली अनुभवायला मिळणार आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘टाइम्स ऑफ इंडिया’ प्रस्तुत ‘स्वयंप्रभा मंच’ आयोजित ‘स्वयंप्रभा शॉपिंग व फूड फेस्टिव्हल’चे दिमाखदार उद्घाटन शुक्रवारी डॉ. व्ही. टी. पाटील सभागृह, राजारामपुरी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. हे शॉपिंग फेस्टिव्हल 10, 11 आणि 12 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत कोल्हापूरकरांसाठी खुले असणार आहे.
या शॉपिंग फेस्टिव्हल उद्घाटन सोहळ्याची सकाळी दीप प्रज्वलनाने सुरुवात झाली. या प्रसंगी घाटगे ग्रुपच्या संचालिका साधना घाटगे, चंदूकाका सराफ ज्वेल्सचे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर राजेंद्र पाटील, तोडकर संजीवनी महिला आरोग्य फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. संजीवनी तोडकर, प्युरासत्व ऑइलच्या संचालिका अस्मिता संघवी आणि प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. स्नेहल हेन्द्रे यांची उपस्थिती होती. या फेस्टिव्हलमध्ये साड्या, कुर्ती, ज्वेलरी, पर्स, बांबू कपडे, विशेष दिवाळी फराळ आणि विविध हस्तकलेच्या वस्तू तेही सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहेत.
स्थानिक महिलांना, तरुणाईला व कुटुंबांना दिवाळीच्या संपूर्ण खरेदीचे आणि मनापसून उपभोगायच्या स्वादिष्ट पदार्थांचे हे उत्कृष्ट व्यासपीठ ठरणार आहे. शॉपिंगच नव्हे, बाजारपेठेत फूड फेस्टिव्हलमध्ये कोल्हापुरी तसेच महाराष्ट्रातील विविध स्वादांचे स्टॉल्स, आरोग्यदायी पदार्थ, दिवाळीचे पारंपरिक फराळ आणि ऑरगॅनिक वस्तू या ठिकाणी मिळणार आहेत.
या उत्सवाचे प्रमुख प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेलर्स, सहप्रायोजक तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र आणि प्युरासत्व लाकडी घाण्यावरील शुद्ध तेल हे आहेत. ग्राहकांना सणासुदीच्या खरेदीला एक नवे स्वरूप, स्थानिक उत्पादकांना व्यवसायवृद्धीस संधी, आणि कोल्हापुरकरांना सांस्कृतिक उत्साहाचा आनंद हे या फेस्टिव्हलचे यश साधणारे घटक ठरणार आहेत.
दिवाळीचे वातावरण अधिक खास आणि संस्मरणीय करण्यासाठी हा फेस्टिव्हल अवश्य अनुभवा असे खास आवाहन ‘स्वयंप्रभा’ मंचच्यावतीने नागरिकांना करण्यात आले आहे. शहरातील उत्सवप्रिय कोल्हापूरकरांची गर्दी आणि व्यापारी वर्गाचा उत्साह या फेस्टिव्हलला आल्हाददायक बनवित आहे.