कोल्हापुरात सदभावना दौडच्या माध्यमातून राजीव गांधी यांना अभिवादन, काँग्रेसच्या वतीने दौडचे आयोजन* *आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून या सद्भावना दौडची राजर्षी शाहू समाधी स्थळापासून सुरुवात*

Spread the news

*कोल्हापुरात सदभावना दौडच्या माध्यमातून राजीव गांधी यांना अभिवादन, काँग्रेसच्या वतीने दौडचे आयोजन*

  1. *आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून या सद्भावना दौडची राजर्षी शाहू समाधी स्थळापासून सुरुवात*

भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त, कोल्हापूर काँग्रेसच्या वतीने आज सदभावना दौड काढण्यात आली. या दौडच्या माध्यमातून स्वर्गीय राजीव गांधी यांना अभिवादन, करण्यात आले. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून या सद्भावना दोडची राजर्षी शाहू समाधी स्थळापासून सुरुवात करण्यात आली.

अमर रहे अमर रहे राजीवजी गांधी अमर रहे अशा घोषणा देत कोल्हापुरात सद्भावना दौड संपन्न झाली. भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 81 व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने या सद्भावना दौड च आयोजन करण्यात आले होते. दर वर्षी दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या नेतृत्वाखाली या सद्भावना दौडचे आयोजन करण्यात येते होते. यंदा काँग्रेसच्या वतीने या दौंड चे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाजवळ अभिवादन करुन ज्योत प्रज्वलित करण्यात आली. यानंतर सीपीआर चौक – दसरा चौक – व्हीनस – कॉर्नर – दाभोळकर कॉर्नर – वटेश्वर महादेव मंदिर आणि मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील राजीव गांधी पुतळ्यापर्यंत ही सद्भावना दौड काढण्यात आली. माजी आमदार ऋतुराज पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राजेश लाटकर यांच्यासह उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून राजीव गांधी यांच्या पुतळ्याला या ठिकाणी अभिवादन केल. पी एन पाटील यांचे विचार हे काँग्रेसचे विचार आहेत आणि त्यांचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सद्भावना दौडचे आयोजन केले आहे. या सदभावना दौडचे दरवर्षी आयोजन करण्यात येईल यामध्ये काँग्रेसच्या वतीने सातत्य राखण्यात येईल. असेही माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी सांगितले.

स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या जयंती निमित्य सद्भावना दौड मध्ये आनंद माने सुर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, सरलाताई पाटील, बाळासाहेब सरनाईक, माजी उपमहापौर संजय मोहिते, बबन रानगे, दत्ता वारके, श्रीराम सोसायटीचे सभापती संतोष पाटील, मधुकर रामाणे, दुर्वास कदम, विक्रम जरग, अर्जुन माने, राहुल माने, प्रविण केसरकर, ईश्वर परमार, रियाज सुभेदार, प्रताप जाधव सरकार, रवि आवळे, जय पटकारे, विनायक फाळके, फिरोज सौदागर धनंजय सावंत, सुभाष बुचडे, तौफीक मुल्लाणी, मोहन सालपे, सुरेश ढोणुक्षे, शशिकांत पाटील, अमर समर्थ, दता बामणे, रमेश चावरे, अनुप पाटील, दिग्विजय मगदूम, सर्जेराव साळोखे, शिवानंद बनसोडे, किसनराव कुऱ्हाडे, भैया शेटके, काका पाटील, संजय पटकारे, संपत चव्हाण, किशोर खानविलकर, महमद शरीफ शेख, अक्षय शेळके, दिपक थोरात, उमेश पाडळकर, संदीप सरनाईक, सुलोचना नायकवडी, वैशाली महाडीक, चंदा बेलेकर, उज्वला चौगले, पूजा आरडे, मंगल खुडे, वैशाली जाधव यांच्यासह कॉग्रेसचे सर्व सेलचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!