कोल्हापूरच्या हवाई सेवेच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा, खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर-नवी मुंबई इंडिगो एअरलाईन्सची विमान सेवा सुरू

Spread the news

कोल्हापूरच्या हवाई सेवेच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा, खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर-नवी मुंबई इंडिगो एअरलाईन्सची विमान सेवा सुरू

­

 

कोल्हापूरच्या विमानसेवेच्या आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणासाठी खासदार धनंजय महाडिक सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यातूनच हवाई सेवेच्या शिरपेचामध्ये आज आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात आला आहे, खासदार महाडिक यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर-नवी मुंबई-कोल्हापूर या हवाई मार्गावर दिवसातून दोन वेळा इंडिगो एअरलाईन्सची विमान सेवा आजपासून सुरू झाली आहे. या हवाई सेवेचं प्रवाशासह सर्वच क्षेत्रातून स्वागत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उडाण संकल्पनेतून देशातील सर्व शहरे विमानसेवेने जोडण्यात येत आहेत. याच उपक्रमात कोल्हापूर हवाई सेवेचा समावेश खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून झालाय. दिवसेंदिवस कोल्हापूर विमानतळाचे आधुनीकीकरण आणि विस्तारीकरण होत आहे. मुंबईसह अन्य शहरेही हवाई सेवेने जोडली जात आहेत. याचबरोबर कनेक्टिव्हीटीही वाढत आहे. याचाच एक भाग म्हणून आजपासून कोल्हापूर-नवी मुंबई-कोल्हापूर या मार्गावर इंडिगो एअरलाईन्सची विमानसेवा सुरू झालीय. दररोज सकाळी आणि संध्याकाळी ही सेवा उपलब्ध होणार आहे. आज या हवाई सेवेचा प्रारंभ खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झाला. सकाळी साडेनऊ वाजता या विमानातून मुंबईला जाणार्‍या प्रवाशांना खासदार धनंजय महाडिक यांनी शुभेच्छा देत, ही नवीन विमानसेवा दिवसातून दोन वेळा सुरू राहणार आहे. त्याचा फायदा होवून मुंबईला वारंवार जाणार्‍या प्रवाशांचा वेळ वाचेल, या हवाई सेवेचा उद्योजकांना मोठा फायदा होणार आहे. तसंच बाहेरील उद्योग, व्यवसाय कोल्हापुरात येण्यासाठी ही कनेक्टिव्हीटी महत्वाची ठरणार आहे. त्याचप्रमाणं या सेवेमुळं पर्यटन वाढीला चालना मिळेल, शिवाय भाविकांचीही चांगली सोय होईल, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. सकाळी कोल्हापुरात दाखल झालेल्या इंडिगो एअरलाईन्सच्या पहिल्या विमानातून महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह अन्य प्रवाशांचे आगमन झाले. खासदार धनंजय महाडिक यांनी या सर्वांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले. तर याच विमानातून मुंबईला जाणार्‍या लोकमत माध्यम समुहाचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा यांच्यासह अन्य प्रवाशांना बोर्डींग पास देवून शुभेच्छा दिल्या. कोल्हापूरचे हवाई क्षेत्र विस्तारत असल्याने सर्वच क्षेत्राला त्याचा नक्कीच लाभ होईल, असा विश्‍वासही खासदार महाडिक यांनी व्यक्त केलाय. आज या नव्या सेवेच्या विमानातून ६७ प्रवासी कोेल्हापुरात आले तर मुंबईला ६५ प्रवासी रवाना झाले. इंडिगो एअरलाईन्सचे हे विमान रोज सकाळी ८ वाजता नवी मुंबई विमानतळावरून टेकऑफ घेईल. तर ९ वाजून १५ मिनिटांनी कोल्हापुरात येईल. १५ मिनिटाच्या विश्रांतीनंतर ९ वाजून ३५ मिनिटांनी इंडिगोचे विमान नवी मुंबईच्या दिशेनं टेकऑफ घेवून १० वाजून २५ मिनिटांनी नवी मुंबई विमानतळावर उतरणार आहे. सायंकाळच्या सत्रात ७ वाजून २० मिनिटांनी नवी मुंबई विमानतळावरून टेकऑफ घेवून, रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर लँडिंग होईल. इथेही २० मिनिटाच्या विश्रांतीनंतर ८ वाजून ५० मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावरून टेकऑफ घेवून, रात्री १० वाजून ३५ मिनिटांनी नवी मुंबईत पोचणार आहे. मुंबईला विविध कामासाठी जाणार्‍या सर्वच घटकांना ही विमानसेवा उपयुक्त ठरणार आहे. मुंबईतील सर्व कामं आटोपून पुन्हा कोल्हापूरला अवघ्या तासाभरात परत येण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळं प्रवाशातून समाधान व्यक्त होत आहे. आजच्या या हवाई सेवेच्या शुभारंभ प्रसंगी कोल्हापूर विमानतळ संचालक अनिल शिंदे, विमानतळ अधिकारी अनिल श्रीवास्तव, राजेश अहिरवार, बेनू नायक, अंकित व्यास, रविराज लामकाने, राजेश पेडणेकर यांच्यासह इंडिगो एअरलाईन्सचे अधिकारी उपस्थित होते.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!