*कोरे डिप्लोमा संघाचे विभागीय महिला बास्केटबॉल स्पर्धेत यश*
*फोटो ओळी* :आंतर पदविका अभियांत्रिकी विद्यार्थी क्रीडा संघटना महाराष्ट्र राज्य महिला बास्केटबॉल विभागीय स्पर्धेत यश संपादन केलेल्या तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (डिप्लोमा) संघाचा गौरव सोहळा प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जीनी, प्राचार्य पी.आर. पाटील, मार्गदर्शक डॉ. पी.एम. पाटील,क्रिडा समन्वयक प्रा.एस एस. चव्हाण आणि विजेता संघ.*
**वारणानगर :** विद्यावर्धिनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पाल यांच्या वतीने आयोजित आंतर पदविका अभियांत्रिकी विद्यार्थी क्रीडा संघटना महाराष्ट्र राज्य महिला विभागीय बास्केटबॉल स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विविध अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयांच्या महिला संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (डिप्लोमा), वारणानगर येथील महिला बास्केटबॉल संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरीत दणदणीत विजय मिळवून झोन चॅम्पियन होण्याचा मान पटकावला.
संपूर्ण स्पर्धेदरम्यान तात्यासाहेब कोरे (डिप्लोमा) संघाने शिस्तबद्ध बचाव, अचूक पासिंग आणि वेगवान आक्रमण यांचा सुरेख संगम साधत प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व राखले. उपांत्य फेरीत प्रभावी कामगिरी करत अंतिम सामन्यात आत्मविश्वासपूर्ण आणि नियोजनबद्ध खेळ सादर केला. निर्णायक क्षणी संघभावना आणि जिद्दीच्या जोरावर विजय निश्चित करण्यात संघ यशस्वी ठरला.
विजेत्या संघात उल्कार्शा मानसींग सूर्यवंशी, मृणाली मानसींग वास्कर, श्रद्धा राजेंद्र पाटील, नेहा सुभाष पाटील, ऋतुजा सुभाष पाटील, साक्षी दिलीप आलोक, निशा महादेव शिंदे, विद्या तुकाराम पवार, वैभवी विकास चौगुले, स्वप्नाली दत्तात्रय पाटील, अस्मिता शंकर लाकडे आणि गौरी संतोष पाटील या खेळाडूंचा समावेश होता. त्यांच्या उत्कृष्ट समन्वय, मेहनत आणि जिद्दीमुळे संघाने हे उल्लेखनीय यश संपादन केले.
या यशाबद्दल श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे, तसेच श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जीनी यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले. संघाच्या या यशामध्ये क्रीडा शिक्षक श्री. एस. एस. चव्हाण तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य पी. आर. पाटील, मार्गदर्शक डॉ. पी.एम. पाटील.प्रा. एस. बी. पाटील,प्रा.ए.व्ही. शेळके, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.



