कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात युरेका-जिज्ञासाचे आयोजन

Spread the news

कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात युरेका-जिज्ञासाचे आयोजन

­

 

राष्ट्रीय स्तरावरील शोध निबंध, प्रोजेक्ट व प्रेझेंटेशन स्पर्धा

  •  

वारणानगर: अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्यामधील नाविन्यपूर्ण कल्पकतेला चालना मिळावी व विज्ञान विषयक अविष्कार सादर करण्याची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने वारणा विद्यापीठाचे अग्रणी महाविद्यालय तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी गेली ३९ वर्षे “युरेका -जिज्ञासा’ नावाची राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प प्रदर्शन व शोध निबंध स्पर्धा आयोजित करत असते.

यावर्षी शनिवार, दि.११/०४/२०२६ रोजी  युरेका -जिज्ञासा २के२६ या स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले आहे. ह्या स्पर्धेसाठी विद्यार्थ्याना एक लाख पन्नास हजार रुपयांची बक्षिसे मिळणार आहेत. गतवर्षी ह्या स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यातून व वेगवेगळया राज्यातील १००० हुन अधिक विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला होता.

हि स्पर्धा राष्ट्रीय पातळीवरील असून विद्यार्थ्यांच्या संशोधन व चिकित्सक वृत्ती, संवादक्षमता, सर्जनशीलता या गुणांना प्रोत्साहन देते. तसेच त्यांच्यामधील विविध कौशल्ये वृंधिगत करणेसाठी लाभदायक ठरते. यातून अभियंत्याना आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु असणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची जाणीव होते व अत्यावश्यक परिवर्तनाची माहिती प्राप्त होते आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना आपल्या उज्ज्वल करिअरसाठी आणि भविष्यासाठी वाटचाल करता येते अशी माहिती वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे व श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. व्ही.व्ही. कारजिन्री यांनी दिली.

वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी, एन. एच. पाटील आणि कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.

या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गॅलेक्सी सरफेक्ट अँड कंपनीचे कार्यकारी संचालक, वैजनाथ कुलकर्णी व महेश माळकर उपस्थित राहणार आहेत

हि स्पर्धा एकूण अकरा विभागात  घेतली जाणार आहे. त्यामध्ये केमिकल, मेकॅनिकल, सिविल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कंप्यूटर सायन्स अँड इंजीनियरिंग,प्रथम वर्ष,सायबर सिक्युरिटी,कॉम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टिम्स,इलेक्ट्रिकल, एमबीए व एमसीए असे विभाग आहेत. प्रथम वर्ष विभागासाठी वेगळी स्पर्धा आयोजित केली आहे.

नव्याने सुरू झालेल्या सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, आणि टीसीएस स्पॉन्सर्ड कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टम या विभागासाठी सायबर इथिक्स अँड सायबर कायदे, सायबर थ्रेट इंटेलिजन्स, एप्लीकेशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन पावर सिस्टम ऑपरेशन, क्लाऊड कम्प्युटिंग, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानावरती आधारित विषयांचा समावेश युरेका या स्पर्धेमध्ये करण्यात आलेला आहे.

“अपर्णा पुरस्कार” हा प्रत्येक वर्षी जिज्ञासा स्पर्धेच्या सर्व विभागातून असणाऱ्या बेस्ट प्रोजेक्ट साठी ५००० हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येतो. प्रत्येक विभागाकडून या स्पर्धेला प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकास रोख पारितोषकासह आहे..तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला राष्ट्रीय पातळीचे प्रशस्ती पत्र,व सन्मान चिन्ह  देण्यात येणार आहे.

प्राचार्य, डॉ. डी. एन. माने, अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे, विद्यार्थी विकास,डॉ. एन. एस. धाराशिवकर, दिन अकॅडमी डॉ. के. आय. पाटील ,संयोजक डॉ. पी. बी. डेहनकर, सहसंयोजक प्रा. एम. आर. तोडकर,डॉ. एस. एस. बोरचाटे, प्रा. एम. एस. भोसले यांनी संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांना युरेका -जिज्ञासा या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी म्हणजे एक पर्वणीच असल्याचे नमूद केले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विदयार्थी समन्वयक ध्रुव देशवंत, ऐश्वर्या गुरव व विदयार्थी प्रतिनिधी अथक परिश्रम घेत आहेत.

माहितीसाठी व स्पर्धेमध्ये प्रवेशासाठी संपर्क: संयोजक डॉ. पी. बी. डेहनकर, मो. ९७६७१००८७६ वेबसाईट:www.tkietwarana.ac.in


Spread the news

You may also like

error: Content is protected !!