लिंगायत माळी समाजाचा मेळावा उत्साहात, पहिल्याच दिवशी हॉलसाठी नऊ लाखाचा निधी समाजातील कर्तबगारांची आदर्शवत कामगिरी नव्या पिढीसाठी प्रेरणादायी- माजी खासदार निवेदिता माने

Spread the news

 

­

 

लिंगायत माळी समाजाचा मेळावा उत्साहात, पहिल्याच दिवशी हॉलसाठी नऊ लाखाचा निधी

  •  

समाजातील कर्तबगारांची आदर्शवत कामगिरी नव्या पिढीसाठी प्रेरणादायी- माजी खासदार निवेदिता माने

कोल्हापूर : ‘समाजातील कर्तबगार व्यक्तींची आदर्शवत कामगिरी नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरते. लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हयाने समाजाला संघटित करताना त्यांच्यासाठी सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी करत वेगळा वास्तुपाठ घालून दिला आहे. समाजातर्फे उभारण्यात येणाऱ्या सभागृहाला निश्चित मदत करू.’अशी ग्वाही माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांनी दिली.
लिंगायत माळीसमाज कोल्हापूर जिल्हा यांच्यावतीने समाजभूषण व जीवनगौरव पुरस्कार वितरण, समाज बांधवाचा मेळावा असा संयुक्त कार्यक्रम आयोजित केला होता. या समारंभात हुपरी येथील चांदी उद्योजक एस. एम. माळी यांना जीवनगौरव पुरस्कार तर निवृत्त सैनिक अशोक राजाराम माळी यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले. आमदार अशोकराव माने, व माजी खासदार माने यांच्या हस्ते पुरस्कार वितरण समारंभ झाला. मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्कारचे स्वरुप आहे. डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे रविवारी (१४ डिसेंबर ) हा कार्यक्रम झाला. सिने अभिनेता स्वप्नील राजशेखर, सांगलीचे माजी महापौर विजयराव धुळबुळू, उद्योजक अमोल राजमाने, सीताराम बापू चौगुले, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष किरण गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आयोजित वधू –वर मेळाव्याला कोल्हापूर, सांगली, सातारासह कर्नाटकातील समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
आमदार अशोकराव माने म्हणाले, ‘समाजाला न्याय देण्याची भूमिका लोकप्रतिनिधींची आहे. सारा समाज एकत्र आला तर न्याय मिळतो. माळी समाज एकत्र येऊन विधायक काम करत आहे. समाजातर्फे उभारण्यात येणाऱ्या सभागृहाला निश्चित मदत करू. सभागृहाच्या पायाभरणी समारंभादिनी माझ्याकडून मदत पोहोचे होईल.’ लिंगायत माळी समाजाचे जिल्हाध्यक्ष गुरुबाळ माळी म्हणाले ‘समाजातर्फे कोल्हापुरात ‘स्वर्गीय नारायण माळी सभागृह प्रस्तावित आहे. या सभागृहासाठी ७१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला आहे. येत्या दोन वर्षात सभागृहाचे बांधकाम पूर्ण होईल. समाजातील प्रत्येक घटकांनी या सभागृहासाठी मदत करावी.’
पुरस्कारप्राप्त व्यक्तीच्यावतीने चांदी उद्योजक एस. एम. माळी यांच्या स्नुषा स्नेहल यांनी सत्काराला उत्तर दिले. त्या म्हणाले, ‘आजचा दिवस आमच्या कुटुंबासाठी खूप आनंदाचा आहे. चांदी उद्योजक एस. एम. माळी यांनी संघर्षातून वेगळी ओळख निर्माण केली.समाजासाठी निस्वार्थपणे काम केले. अनेकांना मदतीचा हात दिला. त्यांच्या कार्याचा आम्हाला अभिमान वाटतो.’ निवृत्त सैनिक अशोक माळी यांनी सत्काराला उत्तर देताना कृतज्ञता व्यक्त केली. लिंगायत माळी समाजाचे उपाध्यक्ष अनिल माळी, कार्याध्यक्ष संतोष सदाशिव माळी, महिला मंडळाच्या अध्यक्षा वंदना माळी, कार्याध्यक्षा विद्या माळी यांनी स्वागत केले. शिक्षक संतोष माळी यांनी सूत्रसंचालन केले. काशिनाथ माळी यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास  समाजाचे सचिव राजाराम यादव, खजानिस किशोर माळी, माजी अध्यक्ष अशोक माळी, आण्णासाहेब माळी, राजेंद्र माळी, प्राचार्य डॉ. जी.पी. माळी, प्रभाकर कुलगुडे,गणपतराव बेलकूड, तानाजी माळी, राजाराम पुन्नाप्पा माळी,  राजेंद्र कल्लेश माळी, अमोल माळी, दयानंद माळी, महेश माळी, संजय कोरे, आप्पासाहेब माळी, सीए महेश् माळी, हुपरीचे चांदी उद्योजक, अमोल माळी, शशीकांत माळी, राहूल माळी, माजी अध्यक्षा मिनाक्षीताई माळी, साधना माळी, श्रुती कुलगुडे, भारती माळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
………….
सभागृहासाठी कार्यक्रमातच जमला लाखो रुपयांचा निधी
सभागृहाच्या बांधकामासाठी इंजिनीअर अण्णासाहेब माळी, उद्योजक प्रभाकर कुलगुडे, राजेंद्र माळी, युवराज माळी, गोरख माळी, सी. एम. माळी, प्राचार्य जी. पी. माळी – पत्रकार गुरुबाळ माळी यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांची देणगी दिली. जयसिंगपूर येथील गणपतराव बेळकूड यांनी दीड लाख तर कोल्हापुरातील श्रीनिवास दुधगावकर यांनी पन्नास हजार रुपयांचा धनादेश दिला. यळगूड माळी समाजाने पन्नास हजार रुपये सभागृहासाठी दिले. या साऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!