Spread the news

म. फुले द्विजन्मशताब्दीला कोल्हापुरात अभिवादन दिंडीने उठावदार सुरुवात

­

 

महात्मा फुलेंच्या विचारांवर चालण्याची शेकडो लोकांनी घेतली प्रतिज्ञा

  •  

आज संपूर्ण देशभर महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी द्विजन्म शताब्दी वर्ष सुरुवात मोठ्या प्रमाणावर झाली. छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर मध्ये भव्य व वैचारिक स्वरूपामध्ये पालखीमध्ये महात्मा फुले यांचे ग्रंथ साहित्य ठेवून शेकडोंच्या उपस्थितीत अभिवादन दिंडीने फुलेंच्या विचारांच्या जयघोषात प्रारंभ झाला. खासदार शाहू महाराज छत्रपती, माजी खासदार राजू शेट्टी, माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, सरोज पाटील (माई), डॉ.बाबुराव गुरव, समितीचे समन्वयक गिरीश फोंडे, ज्ञानेश महाराव, सीमा पाटील, डॉ. बाबुराव गुरव, अनिल माने, संदिप देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये समता दिंडीला सुरुवात झाली. हलगीच्या तालात महात्मा फुलेंच्या विचारांच्या जयघोषात बिंदू चौकातून दिंडीला सुरुवात छ. शिवाजी महाराज पुतळा महानगरपालिका सीपीआर या मार्गाने छत्रपती शाहू समाधी स्थळ येथे दिंडीचा छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करत समारोप राजू शेट्टी यांच्या द्वारे महात्मा फुले यांच्यावर विचारांनी चालण्याचे प्रतिज्ञेने झाला.
यावेळी खासदार शाहू महाराज म्हणाले,”कोल्हापूर व महात्मा फुले यांच्या विचारांचे अतूट नाते आहे. कोल्हापुरात शिवाजी सत्यशोधक समाजाची स्थापना शाहू महाराजांनी केली. येणाऱ्या काळात महात्मा यांचा विचार कोल्हापूरमधील घरात पोहोचवूया”
राजू शेट्टी म्हणाले ,”म. फुलेंनी शेतकऱ्यांच्या मुक्तीचा जाहीरनामा शेतकऱ्यांचा आसूड व गुलामगिरी ग्रंथात लिहिला. त्या विचाराने शेतकरी चळवळ वाढली पाहिजे.” गिरीश फोंडे म्हणाले ,”महात्मा फुलेंनी समताधिष्ठित समाजाचे ध्येय अपूर्ण आहे.ते अभ्यास व संघर्ष यातून पूर्ण करूया.”
डॉ. साळुंखे म्हणाले ,”महात्मा फुले यांनी शिक्षणाच्या हक्काचा आग्रह धरला, गरीब वंचित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवूया.” सीमा पाटील म्हणाल्या ,”स्त्रियांनी फुलेंच्या विचारांनी गुलामगिरीची परंपरा व व्यवस्था नाकारली पाहिजे.” संदिप देसाई व वसंत मुळीक यांचेही भाषण झाले.महेश जाधव यांनी फुलेंच्या अखंडांचे वाचन केले.
यावेळी आय.सी.शेख,भारती पवार, दिलीप सावंत, चंद्रकांत यादव, शिवाजी परूळेकर, अनुराधा भोसले, अस्मिता चिन्मयी, कादर मलबारी,दगडू भास्कर, अनिल माने, सुवर्णा तळेकर,उत्तम पाटील,रवि जाधव, दिगंबर लोहार,आलोक जत्राटकर, भारत धोंगडे, रुपाली वायदंडे, गीता हासूरकर,बाबसाहेब देवकर, बाबूराव कदम, अनिल चव्हाण,रमेश वडणगेकर,युवराज कदम, माधुरी चौगुले यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.एक हजार विद्यार्थी सहभागी झाले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!