*कोल्हापूर शहराबरोबरच उपनगरांच्या नियोजनबध्द विकासासाठी जनतेने येत्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे, खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन*
कोल्हापूर शहरासह उपनगरांना मूलभूत सुविधा पुरवून सर्वांगीण विकास करण्यासाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. आमदार अमल महाडिक यांच्या १५ लाखांच्या विकास निधीतून उभारलेल्या हस्तीनापूर नगरी येथील सांस्कृतिक सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भाजप आणि महायुतीच्या माध्यमातून विकासकामे मार्गी लावली जातील. त्यासाठी जनतेने येत्या महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार विजयी करून सत्ता द्यावी, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले. थेट पाईपलाईन योजनेच्या पाण्यात एकट्यानेच आंघोळ केली आहे. मात्र अजूनही कोल्हापूरला पाणी मिळत नसल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.
आमदार अमल महाडिक यांच्या १५ लाख रुपयांच्या विकास निधीतून, तसेच भाजपचे मंडल कोषाध्यक्ष सुनील वाडकर यांच्या विशेष प्रयत्नातून, हस्तीनापूर नगरीमध्ये सांस्कृतिक सभागृह बांधण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. येथील महिलांनी औक्षण करून, खासदार धनंजय महाडिक यांचे जल्लोषी स्वागत केले. मंडळाचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह सर्व मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय आजगेकर होते. आमदार अमल महाडिक यांनी कोट्यावधींची विकासकामे करून कोल्हापूर दक्षिण मतदार संघाचा कायापालट केला आहे. विकास कामांच्याबाबतीत आमदार आमदार अमल महाडिक हे जिल्ह्यात अग्रेसर ठरले आहेत, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. कोल्हापूर शहराबरोबरच उपनगरांना मूलभूत सुविधा पुरवून सर्वांगीण विकास केला जाईल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. पूर्वी विकासनिधीला मर्यादा होत्या. मात्र आता केंद्रात भाजपचे आणि राज्यात महायुतीचे सरकार असल्यामुळे विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले. कोल्हापूर शहरातील सर्वच रस्ते कॉंक्रीटचे केले जातील, असे त्यांनी सांगितले. शहरासह उपनगरीय भागाचा संपूर्ण विकास करण्यासाठी जनतेने महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि महायुतीचे सर्व उमेदवारनिवडून देऊन महापालिकेची सत्ता ताब्यात द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. सगळे मीच करतो आहे, असा कांगावा करणार्यांनी थेट पाईपलाईन योजनेच्या पाण्यात अंघोळ केली. मात्र अजूनही कोल्हापूरला हे पाणी मिळत नसल्याचा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी लगावला. सडक, बिजली आणि पाणी ही पूर्वीचीच घोषणा कॉंग्रेस आजदेखील वापरत आहे. परंतु ती केवळ घोषणाच राहिली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सर्वच क्षेत्रात देश आत्मनिर्भर बनवल्याचे खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आय.आर.बी.चा टोल घालवण्यासाठी साडेचारशे कोटींचा निधी दिला होता. आता सर्किट बेंचमुळे कोल्हापुरात पोलीस आयुक्तालयासह विविध प्रकारची १५ शासकीय कार्यालये होणार आहेत. त्यामुळे आर्थिक विकास होवून, जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टीचे मंडल कोषाध्यक्ष सुनील वाडकर यांच्या सामाजिक कार्याचे त्यांनी कौतुक केले. मंडळाचे कार्याध्यक्ष निवास ताम्हणकर, संजय चिले, सुनील महाडेश्वर, मंडळाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी सुनील वाडकर, विजय आजगेकर, राजू दिंडोर्ले, अरुण पाटील, सुनील महाडेश्वर, अशोक पाटील, संतोष उर्फ राजू जाधव, वैभव कुंभार, अनिकेत पाटील, चंद्रकांत संकपाळ, आर. टी. पाटील, सुनील ढवण, अविनाश साठे, राजू धोंडफोडे, गीता पाटील, धनश्री देवर्डेकर, अनिल जोशी, यतीन होरणे, श्रीकांत बैलूर, दत्तात्रय आळवेकर, रमेश वाले, सुहास वर्णे, शुभम चोरगे, सदाशिव मगदूम, बाजीराव पाटील, दत्तात्रय यादव यांच्यासह महिला आणि नागरिक उपस्थित होते.