महात्मा बसवण्णा : जीवन आणि संघर्ष ग्रंथाचे रविवारी प्रकाशन
कोल्हापूर (प्रतिनिधी) : निर्मिती प्रकाशन, प्रकाशित जगतज्योती महात्मा बसवण्णा यांचे ऐतिहासिक कार्यकर्तृत्व व जीवन संघर्ष मांडणारा, जातीअंताची भूमिका घेऊन मानवतावाद जोपासणारा आणि त्यांच्या मानवी मूल्यांची आधुनिकता प्रस्तुत करणारा सुप्रसिद्ध साहित्यिक आणि विचारवंत डॉ. विश्वास सुतार लिखित महात्मा बसवण्णा : जीवन आणि संघर्ष या महत्त्वपूर्ण वैचारिक ग्रंथाचा प्रकाशन समारंभ रविवार दि. 11 मे, 2025 रोजी सायंकाळी 5:30 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, मिनी सभागृह, कोल्हापूर या ठिकाणी कोल्हापूर येथिल कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण हे असणार आहेत.
सदर प्रकाशन समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून महाराष्ट्र राज्य लिंगायत संघर्ष समितीच्या कार्याध्यक्षा सरला पाटील तर प्रमुख वक्ते म्हणून शाहूवाडीचे सुप्रसिद्ध व्याख्याते एम. आर. पाटील उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे निवेदन यश आंबोळे करणार आहेत.
सदर प्रकाशन समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन निर्मिती प्रकाशनचे प्रमुख अनिल म्हमाने, डॉ. शोभा चाळके यांनी केले आहे.