माळी समाज गुणी विद्यार्थ्यांचा 9 जूनला सत्कार, मुलांना सायकल वह्या वाटप, उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सत्कार
कोल्हापूर
लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेच्या वतीने सोमवार दिनांक 9 जून रोजी समाजातील गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ होणार आहे. कोल्हापुरातील दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
लिंगायत समाजाच्या वतीने दरवर्षी समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. यंदाही या गुणी विद्यार्थ्यांच्या सत्काराबरोबरच जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. समाजातील होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्या व सायकल वाटप होणार आहे.
समाजाच्या कार्यात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या विविध व्यक्तींचाही यावेळी कृतज्ञता गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याबरोबरच विविध पुरस्काराचेही वितरण करण्यात येणार आहे. दरम्यान महात्मा फुले समाज रत्न पुरस्कार राजेंद्र माळी यांना तर सावित्रीबाई फुले आदर्श माता पुरस्कार इंदुताई माळी यांना जाहीर करण्यात आला संत बसवेश्वर आदर्श कुटुंब पुरस्कार कसबा सांगाव येथील बाळासाहेब माळी यांच्या परिवाराला देण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले
या समारंभाच्या तयारीसाठी झालेल्या बैठकीत बैठकीस समाजाचे अध्यक्ष
गुरुबाळ माळी, उपाध्यक्ष अनिल माळी, कार्याध्यक्ष संतोष माळी, महिला संघटनेच्या अध्यक्षा वंदना माळी, उपाध्यक्ष वैशाली माळी, कार्याध्यक्ष विद्या माळी, सचिव राजाराम यादव खजानिस किशोर माळी, श्रुती कुलगुडे, भारती माळी, तानाजी माळी, राजाराम माळी, संतोष माळी सर, सुनील माळी , घनशाम माळी, अशोक माळी, संजय कोरे, दीपक चौगुले, महेश माळी, सुभाष माळी, दयानंद माळी, पांडुरंग माळी, प्रभाकर कुलगुडे, राजेंद्र माळी, रंगराव माळी, इंद्रायणी चौगुले, अंकिता माळी, गोकुळा माळी, भाग्यश्री माळी, रूपाली माळी, पुष्पा माळी, अभिनव गोंधळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी अभिनय गोंधळी यांना स्वीकृत संचालक म्हणून सन्मानित करण्यात आले. पांडुरंग माळी, महादेव चौगुले यांचा वाढदिवस साजरा करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.